मोबाईल चार्जर नेहमी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे का असतात?; कारण आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:39 PM2024-09-10T12:39:00+5:302024-09-10T12:39:56+5:30
तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जर वापरता पण तुम्ही त्याच्या रंगाबाबत कधी विचार केला आहे का?
तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जर वापरता पण तुम्ही त्याच्या रंगाबाबत कधी विचार केला आहे का? चार्जर नेहमी काळ्या किंवा पांढऱ्या रंगात दिसतात. पण त्याचा रंग फक्त पांढरा किंवा काळा का असतो? यामागे काही खास कारण आहे. टेक्निक, डिझाईन आणि उपयुक्तता यांच्याशी संबंध आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया...
काळा रंग उष्णता अधिक प्रभावीपणे शोषून घेतो. काळा हा "इमिटर" मानला जातो आणि त्याची इमिशन व्हॅल्यू १ असते. याचा अर्थ काळा रंग त्याच्या पृष्ठभागावर उष्णता अधिक चांगल्या प्रकारे शोषू शकतो, जे इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे चार्जरची कार्यक्षमता सुधारते कारण ते अधिक स्थिर तापमानावर चालतं.
या रंगामागचं दुसरं कारण हे आर्थिक आहे. इतर रंगांपेक्षा ब्लॅक मटेरिअल उत्पादनासाठी सामान्यतः स्वस्त असते. ब्लॅक पेंटिंग किंवा कोटिंगची किंमत इतर रंगांपेक्षा कमी आहे, ज्यामुळे कंपनीचा खर्च कमी होतो. चार्जर उत्पादक कंपन्यांसाठी काळा रंग निवडणं हे आर्थिक दृष्ट्या फायदेशीर आहे.
याआधी चार्जर काळ्या रंगाचे होते, पण आता पांढऱ्या रंगाचे चार्जर देखील सामान्य झाले आहेत. पांढऱ्या रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये लो रिफ्लेक्ट कॅपिसिटी असते. याचा अर्थ असा की पांढरा रंग बाह्य उष्णता शोषून घेत नाही. तर ती बाहेरच ठेवतो. म्हणजेच पांढऱ्या रंगाचा चार्जर बाहेरून येणारी उष्णता आत जाऊ देत नाही, ज्यामुळे चार्जरचे तापमान नियंत्रित राहते.
पांढऱ्या रंगाचे हे वैशिष्ट्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे तापमान स्थिर ठेवण्यास उपयुक्त ठरते. यामुळेच आतील शिसे लाल किंवा निळ्या रंगात दिसू शकतात परंतु चार्जर अडॅप्टरचा रंग फक्त काळा किंवा पांढराच असतो. तसेच पांढरा रंग स्वच्छ दिसतो. अनेक कंपन्या त्यांचं चार्जर पांढऱ्या रंगात बनवतात कारण हा रंग अधिक क्लासिक आणि प्रीमियम दिसतो, जो ग्राहकांना आकर्षित करतो.