हल्ली नव्या स्मार्टफोन्स सोबत ‘चपट्या पिन’चा Micro USB चार्जर का देत नाहीत? जाणून घ्या उत्तर
By सिद्धेश जाधव | Published: February 3, 2022 06:44 PM2022-02-03T18:44:53+5:302022-02-03T18:55:26+5:30
Why New Smartphones Are Not Coming With Micro USB Charger: दोन वर्षांपूर्वी लोकप्रिय असणारा चपट्या पिनचा चार्जर हल्लीच्या स्मार्टफोन्स सोबत का मिळत नाही? चला जाणून घेऊया.
जर तुम्ही गेले 5-6 वर्ष स्मार्टफोन्स वापरत असाल किंवा पाहात असाल तर तुम्ही एका मोठ्या बदलाचे साक्षीदार आहात. हा बदल म्हणजे सध्या येणारे स्मार्टफोन चपट्या पिनच्या (Micro USB) चार्जर ऐवजी टाईप-सी (USB Type C) सह बाजारात येत आहेत. परंतु दोन वर्षांपूर्वी लोकप्रिय असणारा चपट्या पिनचा चार्जर हल्लीच्या स्मार्टफोन्स सोबत का मिळत नाही? चला जाणून घेऊया.
चपट्या पिनचा चार्जर म्हणजे मायक्रो यूएसबीचे प्रकार अनेक आहेत. हा चार्जर फक्त फोन्स नव्हे तर डिजिटल कॅमेरा आणि अन्य डिव्हाइसेसमध्ये वापरला जात होता. अजूनही काही डिव्हाइसेससोबत हा चार्जर येतो. यूएसबी टाईप-सी चे देखील अनेक प्रकार आहेत. हा चार्जर देखील गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर बदलला आहे. याचा वापर नवीन स्मार्टफोन आणि कम्प्युटर्समध्ये देखील केला जातो.
दोन्ही चार्जर्सच्या प्रकारात मोठा फरक आहे. मायक्रो यूएसबीचा डेटा ट्रान्स्फरचा स्पीड फक्त 480 एमबीपीएस आहे, तर टाईप-सी केबल 10 जीबीपीएसचा डेटा ट्रान्सफर स्पीड देते. चार्जिंगचा स्पीड देखील टाईप-सी केबलमध्ये 100W पर्यंत जाऊ शकतो, तर मायक्रो यूएसबी फक्त 60W पर्यंत स्पीड देऊ शकतो. टाईप-सी चार्जर तुम्ही कोणत्याही बाजूने प्लग करू शकता. पण जर मायक्रो यूएसबीची चुकीची बाजू प्लग केली तर तुमचा चार्जिंग पोर्ट आणि चार्जर दोन्ही बिघडू शकतात.
या सर्व कारणांमुळे स्मार्टफोन कंपन्या चपट्या पिनच्या चार्जरचा निरोप घेत आहेत. परंतु अजूनही हा चार्जर काही स्मार्ट डिव्हाइसेसमध्ये दिसत आहे. तर यूएसबी टाईप-सी चार्जर आता लवकरच अॅप्पलच्या आयफोनमध्ये देखील बघायला मिळू शकतो. युरोपियन युनियननं सर्व स्मार्टफोन्सचा एकच चार्जर असावा म्हणजे पर्यावरणाची हानी कमी होईल, असं म्हटलं आहे. यासाठी युनियननं यूएसबी टाईप-सी ला पसंती दर्शवली आहे, त्यामुळे टेक जाएंट अॅप्पलला देखील युरोपात विक्री करण्यासाठी अँड्रॉइड स्मार्टफोनचा चार्जर वापरावा लागू शकतो.
हे देखील वाचा:
- 7500 रुपयांमध्ये घरी आणा Realme चा हा जबराट स्मार्टफोन; ईएमआय किंवा एक्सचेंज ऑफरविना मिळतेय सूट, 5 फेब्रुवारीपर्यंत ऑफर
- Best Smart TV Under 20000: हे आहेत 20 हजारांच्या आत येणारे बेस्ट स्मार्ट टीव्ही; Flipkart Sale मध्ये मिळतायत जबरदस्त ऑफर्स