टी-शर्टवर का, मोबाइलवर डाऊनलोड करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 05:14 AM2021-08-11T05:14:05+5:302021-08-11T05:14:32+5:30

लवकरच लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेल्या लोकांसाठी लोकलसारख्या अत्यावश्यक सेवा खुल्या केल्या जाण्याची शक्यता आहे. अशावेळी तुमचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

Why print vaccination certificate on Tshirt download it on mobile | टी-शर्टवर का, मोबाइलवर डाऊनलोड करा!

टी-शर्टवर का, मोबाइलवर डाऊनलोड करा!

googlenewsNext

- - प्रसाद ताम्हनकर (prasad.tamhankar@gmail.com)

सामान्य जनतेच्या सोयीसाठी सध्या सरकारने अनेक ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येत असल्याने अनेक लोक त्याचा मोठ्या प्रमाणावर वापरदेखील करत आहेत. mParivahan आणि MyGov ही अशीच दोन महत्त्वाच्या सेवा देणारी ॲप आहेत, जी तुमच्या मोबाइलमध्ये असायलाच हवीत. 

लवकरच लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेल्या लोकांसाठी लोकलसारख्या अत्यावश्यक सेवा खुल्या केल्या जाण्याची शक्यता आहे. अशावेळी तुमचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. आता सरकारने ही सेवा अधिक सुटसुटीत करण्याच्या हेतूने लसीकरणाचे सर्टिफिकेट MyGov या ‘चॅटबॉट’च्या माध्यमातून व्हॉट्सॲपवरदेखील उपलब्ध करून दिले आहे. यासाठी तुम्हाला आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये  919013151515 हा नंबर सेव्ह करायचा आहे. त्यानंतर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ह्या नंबरवर Download Certificate असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाइलवर एक सहा अंकी OTP येईल. तो मेसेज केल्यानंतर, तुमच्या मोबाइल नंबरद्वारे  जितक्या लोकांची लसीकरणासाठी नोंदणी केली असेल, त्यांची नावे क्रमवार दिसतील. हव्या त्या व्यक्तीचा नंबर मेसेज केल्यानंतर, त्या व्यक्तीच्या नावाचे सर्टिफिकेट PDF फाइलच्या स्वरूपात त्वरित उपलब्ध करून दिले जाईल.  दुसरी महत्त्वाची सेवा पुरवणारे ॲप म्हणजे mParivahan. बरेचदा कामाच्या गडबडीत आपण ड्रायव्हिंग लायसन्स अथवा गाडीची कागदपत्रे घरीच विसरून जातो. अशा वेळी पोलिसांनी तपासणी केल्यास, दंड भरण्याशिवाय दुसरा पर्यायदेखील उपलब्ध नसतो. बरेचदा लायसन्स अथवा गाडीच्या कागदपत्रांचे मोबाइलमध्ये सेव्ह केलेले फोटो पोलीस ग्राह्य धरत नाहीत आणि वाद होतात. आता कायदेशीररीत्या मान्य होतील अशी कागदपत्रे मोबाइलमध्ये ठेवण्याची सोय सरकारद्वारे करण्यात आली आहे. या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीचे RC डाऊनलोड करून घेऊ शकता आणि मोबाइलमध्ये ‘डिजिटल’ स्वरूपात सेव्हसुद्धा करून ठेवू शकता. यामुळे कागदपत्रे घेऊन हिंडणे, त्यांची वाऱ्या-पावसात काळजी घेणे अशा सगळ्या कटकटींपासूनदेखील सुटका मिळणार आहे.

 

Web Title: Why print vaccination certificate on Tshirt download it on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.