देशात 4G फोन बंद होणार? मोदी सरकारने कंपन्यांसोबत महत्वाची बैठक घेतली, दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 12:32 PM2022-10-13T12:32:57+5:302022-10-13T12:33:20+5:30
स्मार्टफोन कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 4G स्मार्टफोनचे उत्पादन थांबवावे, असे दूरसंचार विभाग (DoT) ने बैठकीत सुचवले आहे.
मोदी सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये बुधवारी एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत 5G नेटवर्क आणि 5G स्मार्टफोन वर काही निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये 5G स्मार्टफोनमध्ये लवकरात लवकर जल्द 5G सपोर्ट सॉफ्टवेयर अपडेट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ५जी स्मार्टफोनची उपलब्धता वाढविण्यावरही जोर देण्यात आला आहे.
यासाठी १० हजार रुपयांपेक्षा किंमतीच्या प्रत्येक फोनमध्ये ५जी असायला हवे, असे सांगण्यात आले आहे. यामुळे १० हजारांपेक्षा कमी किंमतीच्या फोनमध्ये ४जी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे काही कंपन्या ४जी फोन बनविणे देखील बंद करण्याची शक्यता आहे.
स्मार्टफोन कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 4G स्मार्टफोनचे उत्पादन थांबवावे, असे दूरसंचार विभाग (DoT) ने बैठकीत सुचवले आहे. यामुळे यूजर्सना 4G वरून 5G स्मार्टफोनवर शिफ्ट करणे सोपे होणार आहे, असेही डॉटचे म्हणणे आहे. मध्यम श्रेणीतील ग्राहकांना 5G कनेक्टिव्हिटी असलेले स्मार्टफोन उपलब्ध करून दिले जातील. यामुळे या फोनची किंमत वाढण्याची शक्यता आहे.
Realme सारख्या स्मार्टफोन कंपन्यांनी 12,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सर्व स्मार्टफोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी दिली जाईल, असे आधीच म्हटले आहे. बजेट स्मार्टफोन श्रेणीतील कंपन्यांसाठी हे त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. 4G वरून 5G वर जाण्यासाठी जास्त गुंतवणूक आणि हार्डवेअर सपोर्टची गरज भासणार आहे. काही स्मार्टफोन कंपन्या 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या 4G स्मार्टफोनची चांगली विक्री करत आहेत.