अद्यापही सेमीकंडक्टर्सचा तुटवडा; कार आणि गॅजेट्स महागच राहणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 11:37 AM2021-12-16T11:37:46+5:302021-12-16T11:38:01+5:30
भारतासह जगभरातील कंझ्यमुर इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटो कंपन्यांना सध्या सेमीकंडक्टर चिप आणि कॉम्पोनन्ट्सच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे
भारतासह जगभरातील कंझ्यमुर इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटो कंपन्यांना सध्या सेमीकंडक्टर चिप आणि कॉम्पोनन्ट्सच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे वाहतूक खर्चातही सहापट वाढ झाली आहे. पुढील वर्षाच्या जून महिन्यापर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
यांची भासणार टंचाई
- स्मार्टफोन
- लॅपटॉप
- टीव्ही
- रेफ्रिजरेटर
- कार
या गाड्या होणार महाग
- मारुती सुझुकी ह्युंदाई
- टाटा मोटर्स मर्सिडीझ ऑडी
खेळ आकड्यांचा
- इलेक्ट्रॉनिक आणि ऑटो कॉम्पोनन्ट्सच्या किमती
- ४० ते १०० टक्क्यांनी वाढल्या.
- ऑटो कंपन्यांच्या एकूण विक्रीत पाच अब्ज डॉलरची घसरण झाली.
- वाहतूक खर्च ६ पट वाढला.
- सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे भारतात यंदा ५ लाख वाहनांची निर्मिती होऊ शकली नाही.
- भारतातील कारविक्रीत घट झाली.
- महागाई कायम
- कॉम्पोनन्ट्सच्या किमतींमध्ये झालेली दुप्पट वाढ आणि सहापट वाढलेला वाहतूक खर्च यांमुळे कार्सची विक्री यंदा २० टक्क्यांनी घसरली.
- आणखी सहा महिने ही स्थिती कायम राहणार असल्याने कार आणि गॅजेट्सच्या किमती चढ्याच राहणार आहेत.
असा वाढला वाहतूक खर्च - डिसेंबर २०२० - $ ४०००
वाढ : ३१५%
जुलै २०२१ -$ ७३९५
वाढ : ८५%
नोव्हेंबर २०२१- $ ९८००
वाढ : ३२%