Nokia 6 (2018) हा स्मार्टफोन आज लॉन्च होणार? लीक झाले फिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 03:09 PM2018-01-05T15:09:02+5:302018-01-05T17:05:14+5:30
स्मार्टफोन मार्केटमध्ये अग्रेसर असलेल्या नोकिया कंपनीचा बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन नोकिया 6 शुक्रवारी लॉन्च होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत नोकिया कंपनीकडून अद्याप कोणत्याही खुलासा करण्यात आली नाही.
मुंबई : स्मार्टफोन मार्केटमध्ये अग्रेसर असलेल्या नोकिया कंपनीचा बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन नोकिया 6 शुक्रवारी लॉन्च होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत नोकिया कंपनीकडून अद्याप कोणत्याही खुलासा करण्यात आली नाही. एका रिपोर्टनुसार, शुक्रवारी (दि. 5) म्हणजेच आज नोकिया 6 हा स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतो. याचबरोबर या स्मार्टफोनचे स्फेसिफिकेशनही लीक झाल्याचा दावा एका चीनच्या रिटेलरने केला आहे. याबाबतचा एक टीझर विबो या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आला आहे.
लीकच्या झालेल्या स्पेसिफिकेशनबाबत सांगायचं तर नोकियाची सहकारी कंपनी एचएमडी ग्लोबल नवीन स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाचा फुल एचडी 1920 x 1080 डिस्प्ले देऊ शकते. तसेच, स्मार्टफोनचा हा डिस्प्ले 18:9 च्या ऑस्पेक्ट रेशोसोबत येईल, असे सांगण्यात येत आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 630 प्रोसेसर असणार आहे. तसेच, 4 जीबी रॅमसोबत असेल. 2018 मध्ये रिलीज होणा-या या डिव्हाईसच्या पाठीमागे फिंगरप्रिन्ट स्कॅनरची सुविधा असणार आहे. यासोबतच नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये 32 जीबी आणि 64 जीबी मेमरीचा पर्याय देण्यात आलाय. अॅन्ड्रॉईड व्हर्जनची माहिती सध्या समोर आलेली नाहीये. पण त्यात 8 मेगापिक्सल आणि 16 मेगापिक्सल कॅमेरा असेल. सोबतच फोनमध्ये रिअर माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर असण्याची शक्यता आहे. नोकिया 6 स्मार्टफोनच्या इंटरनल मेमरीला मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येणार आहे. याशिवाय, नोकिया 6 मध्ये तीन हजार एमएएच पावरची बॅटरी दिली जाऊ शकते.
एचएमडी ग्लोबलने अद्याप नोकिया 6 स्मार्टफोनबाबत अद्याप कोणतीही पुष्टी दिली नाही. परंतू हा स्मार्टफोन येत्या काही दिवसांत मार्केटमध्ये येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या 19 जानेवारीला चीनमध्ये नोकिया कंपनी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. यामध्ये नोकिया 6, नोकिया 9, नोकिया 8, नोकिया 4 , नोकिया 7 प्लस आणि नोकिया 1 असे स्मार्टफोन लॉन्च होण्याची शक्यता आहे.