2020पर्यंत मिळणार नाही दिलासा; आऊटगोइंग कॉलसाठी द्यावे लागणार 6 पैसे प्रति मिनिट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 08:59 AM2019-12-18T08:59:10+5:302019-12-18T09:00:42+5:30
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(ट्राय)ने मोबाइल ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.
नवी दिल्लीः भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(ट्राय)ने मोबाइल ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एक ऑपरेटरच्या नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्क कॉल केल्यास 6 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारलं जाणार असल्याचं ट्रायनं स्पष्ट केलेलं आहे. एक वर्षापर्यंत म्हणजेच 31 डिसेंबर 2020पर्यंत हे शुल्क वसूल केलं जाणार आहे. ट्रायनं आपल्या विधानात सांगितलं होतं की, वायरलेस टू वायरलेस घरगुती कॉल्सवर सहा पैसे प्रतिमिनिट टर्मिनेशन शुल्क 31 डिसेंबर, 2020पर्यंत आकारलं जाणार आहे.
पहिल्यांदा हे शुल्क 14 पैसे प्रतिमिनिट आकारलं जात होतं, 2017ला ते घटवून सहा पैसे प्रतिमिनिट करण्यात आलं आहे. 1 जानेवारी 2020पर्यंत हे शुल्क संपुष्टात येणार असल्याचं बोललं जात आहे. ट्रायनं या शुल्क वसुलीची मुदत एका वर्षानं वाढवली आहे. वायरलेस टू वायरलेस घरगुती कॉल्सवर सहा पैसे प्रतिमिनिट शुल्क एक जानेवारी 2021पर्यंत संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. ट्रायच्या या निर्णयाचं सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI)नं स्वागत केलं आहे. सीओएआयचे महासंचालक राजन एस. मॅथ्यू म्हणाले, ट्रायचं हे पाऊल योग्य दिशेनं पडलं आहे. COAIनं दूरसंचार क्षेत्रातील गंभीर वित्तीय तणाव दूर करण्यासाठी आम्ही सरकार आणि नियामकांसोबत असल्याचं सांगितलं आहे.
Telecom Regulatory Authority of India (TRAI): For wireless to wireless domestic calls, termination charge would continue to remain as Re. 0.06 per minute up to 31st Dec, 2020. From Jan 1, 2021 onwards, the termination charge for wireless to wireless domestic calls shall be zero.
— ANI (@ANI) December 18, 2019
जिओला मोठा झटका
ट्रायच्या या निर्णयानं जिओला मोठा झटका बसला आहे. कारण आययूसी शुल्क वसूल करताना जिओनं सांगितलं होतं की, हे शुल्क काही महिन्यांसाठी आकारलं जाणार आहे. त्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. परंतु आता जिओ 31 डिसेंबर 2020पर्यंत आययूसी शुल्क समाप्त करू शकणार नाही. अशातच जिओच्या वापरकर्त्याला पुढच्या एक वर्षापर्यंत आययूसी शुल्क द्यावं लागणार आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग करता येते.