तुम्ही घेतलेले 5G फोन आऊटडेटेड होणार? मोदी सरकार नवा नियम आणतेय; कंपन्याही टेन्शनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 03:23 PM2022-09-27T15:23:34+5:302022-09-27T15:23:55+5:30

बरेचजण एकदा फोन घेतला की तीन-चार वर्षे वापरतातच. अनेकजण वर्षा वर्षाला किंवा तीन चार महिन्याला फोन बदलत असतात. पण जे खूप वर्षांसाठी फोन घेणार आहेत, त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे.

Will this 5G smartphones be outdated? Modi government is bringing new rules on GPS; Samsung, Apple, Xioami, Vivo Companies are also under tension | तुम्ही घेतलेले 5G फोन आऊटडेटेड होणार? मोदी सरकार नवा नियम आणतेय; कंपन्याही टेन्शनमध्ये

तुम्ही घेतलेले 5G फोन आऊटडेटेड होणार? मोदी सरकार नवा नियम आणतेय; कंपन्याही टेन्शनमध्ये

Next

सध्या ५ जी चे स्मार्टफोनचा बाजारात कल्ला करून कंपन्या गल्ला भरू लागल्या आहेत. मा    त्र, मोदी सरकार एक नवा नियम घेऊन येत आहे. यामुळे आता तुम्ही घेत असलेले स्मार्टफोन काही वर्षांनी उपयोगाचे राहणार नाहीएत. १ जानेवारी २०२५ पासून हा नवा नियम लागू होणार असला तरी त्याला अजून दोन वर्षे तरी आहेत. काय आहे हा नियम...

बरेचजण एकदा फोन घेतला की तीन-चार वर्षे वापरतातच. अनेकजण वर्षा वर्षाला किंवा तीन चार महिन्याला फोन बदलत असतात. पण जे खूप वर्षांसाठी फोन घेणार आहेत, त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे. कारण मोदी सरकारच्या नियमानुसार १ जानेवारी २०२५ पासून प्रत्येक स्मार्टफोनमध्ये स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टिमवरील अॅप्लीकेशन NavIC इनबिल्ट करावे लागणार आहे. 

सध्या गुगल मॅप हे इनबिल्ट असते. परंतू या तारखेनंतर navIC नसेल तर फोनची विक्री कंपन्यांना करता येणार नाही. सरकारच्या या निर्णयाने चायनिज कंपन्यांची तर झोप उडालीच आहे, परंतू अॅपल, सॅमसंगसारख्या कंपन्यांनाही कोड्यात टाकले आहे. या बाबत नुकतीच मोदी सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये हे अॅप नाही तर स्मार्टफोन विकू देणार नाही असे मोदी सरकारने ठणकावले आहे. 

सरकार भारतात विकल्या जाणार्‍या सर्व स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट NavIC ऍप्लिकेशनसाठी जोर देत आहे. भारतात विकल्या जाणार्‍या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये अमेरिकन नेव्हिगेशन सिस्टीम वापरावी अशी सरकारची इच्छा नाही. नवीन नियमानुसार स्मार्टफोन बनवण्यासाठी हार्डवेअर बदलावे लागणार आहेत. यासाठी संशोधन आवश्यक असेल. यासोबतच चाचणीची मंजुरीही घ्यावी लागणार आहे, असे कंपन्यांनी सांगितले आहे.

चीन, जपान, युरोपियन युनियन आणि रशिया त्यांच्या स्वतःच्या जागतिक आणि प्रादेशिक नेव्हिगेशन प्रणाली वापरतात. देशात प्रादेशिक नेव्हिगेशन सॅटेलाइट प्रणालीच्या वापरावर भर द्यावा अशा पंतप्रधान मोदींच्या सूचना आहेत. यानुसार डॉटने या कंपन्यांसोबत बैठक घेतली. सर्व 5G फोनमध्ये इनबिल्ट नेव्हीआयसी वापरण्यास सांगितले आहे. पुढील 2 वर्षांत 80 टक्के नवीन स्मार्टफोन 5G असतील. Mediatek कंपनीने त्यांच्या ५जी प्रोसेसरमध्ये NavIC ची प्रणाली असेल असे म्हटले होते. 

Web Title: Will this 5G smartphones be outdated? Modi government is bringing new rules on GPS; Samsung, Apple, Xioami, Vivo Companies are also under tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.