Windows 11 आज होणार लाँच; इथे बघा थेट प्रक्षेपण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 07:14 PM2021-06-24T19:14:12+5:302021-06-24T19:15:22+5:30
Windows 11 Launch: एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून Microsoft Windows 11 लाँच केली जाईल, हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 वाजता सुरु होईल.
आज Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम लाँच केली जाईल. Microsoft ने आपल्या नव्या ऑपरेटिंग सिस्टमच्या लाँचसाठी एका ऑनलाईन लाँच लाइवस्ट्रीमचे आयोजन केले आहे. 2015 मध्ये लाँच केलेल्या Windows 10 नंतर प्रथमच कंपनी नवीन ऑपरेटिंग सिस्टम लाँच करत आहे. काही दिवसांपूर्वी लीक झालेल्या ओएसच्या बिल्ड मधून समजले आहे कि विंडोज 11 मध्ये पूर्णपणे नवीन इंटरफेस आणि अॅनिमेशन इफेक्ट्स असतील.
Windows 11 लाँच इव्हेंट
Microsoft Windows 11 चा लाँच आज 11am ET म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 8:30pm वाजता सुरु सुरु होईल. या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण ऑनलाइन केले जाईल, जे तुम्ही विंडोज इव्हेंट वेबपेजच्या माध्यमातून बघू शकता.
Windows 7 आणि Windows 8.1 युजर्सना मोफत मिळू शकतो अपग्रेड
लीक झालेल्या Windows 11 ची बिल्डमध्ये कॉन्फिगरेशन कीज दिसल्या होत्या. या कीजमध्ये Windows 7 आणि Windows 8.1 चे टाइटल आहेत. यावरून असा अंदाज लावला जात आहे कि, माइक्रोसॉफ्ट जुन्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टमच्या युजर्सना मोफत अपग्रेड देऊन विंडोज 11 वर घेऊन येणार आहे.
असेच काहीसे मायक्रोसॉफ्टने Windows 10 च्या वेळी देखील केले होते. तेव्हा सुरु करण्यात आलेल्या अपग्रेड प्रोग्रॅमअंतर्गत कंपनीने Windows 7 आणि Windows 8 युजर्सना मोफत Windows 10 चा अपग्रेड दिला होता. त्यानंतर मायक्रोसॉफ्टने Windows 7 साठी सपोर्ट देणे बंद केले होते.
आज लाँच होणाऱ्या Windows 11 ऑपरेटिंग सिस्टममध्ये नवीन स्टार्ट मेन्यू देण्यात येईल आणि असेच अनेक बदल दिसतील जे Windows 10 पेक्षा वेगेळे असतील. लाँच झाल्यानंतर त्वरित हि सिस्टम जुन्या युजर्ससाठी उपलब्ध होईल कि नाही याबाबत मात्र अजूनतरी माहिती मिळाली नाही.