2025 पर्यंत मिळणार Windows 10 ला सपोर्ट; ‘या’ तारखेला रोल आऊट होणार Windows 11

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 05:20 PM2021-09-01T17:20:04+5:302021-09-01T17:21:53+5:30

Microsoft Windows 11 release: मायक्रोसॉफ्टने विंडोज 11 ची रिलीज डेट सांगितली आहे. रोल आऊटनंतर काही दिवसांनी पीसीवर Android अ‍ॅप्स वापरता येतील.  

Windows 11 release date set october 5 no android apps support at launch  | 2025 पर्यंत मिळणार Windows 10 ला सपोर्ट; ‘या’ तारखेला रोल आऊट होणार Windows 11

2025 पर्यंत मिळणार Windows 10 ला सपोर्ट; ‘या’ तारखेला रोल आऊट होणार Windows 11

Next

मायक्रोसॉफ्टची नवीन ऑपरेटिंग सिस्टम Windows 11, पुढील महिन्यात 5 ऑक्टोबरपासून रोल आऊट करण्यात येईल. याची माहिती Microsoft ने मंगळवारी दिली. ही ऑपरेटिंग सिस्टम जूनच्या अखेरीस सदर करण्यात आली होती. 5 ऑक्टोबरला विंडोज 11 चा मोफत अपग्रेड सर्व पात्र Windows 10 PC साठी देण्यात येईल. या ऑपरेटिंग सिस्टममध्ये अँड्रॉइड ऍप्स सपोर्ट मिळणार नाही, परंतु यावर काम करत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.  

मायक्रोसॉफ्ट 5 ऑक्टोबरपासून Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम Windows 10 वरील पात्र पीसीसाठी रोल आउट करण्यास सुरुवात करणार आहे. पहिल्याच दिवशी सर्व सर्व पीसी नवीन व्हर्जनवर अपडेट होणार नाहीत, ही प्रक्रिया टप्प्या टप्प्यात पार पडेल. कंपनीने सर्व पात्र डिवाइस 2022 पर्यंत नवीन 11 वर मोफत अपग्रेड केले जातील, असे सांगितले आहे. विंडोज युजर सेटिंगमध्ये जाऊन विंडोज अपडेट उपलब्ध झाला आहे कि नाही हे बघू शकतात. जर तुमचा पीसी विंडोज 11 साठी पात्र नसेल, तर माइक्रोसॉफ्टकडून 14 ऑक्टोबर, 2025 पर्यंत विंडोज 10 चा सपोर्ट देण्यात येईल.  

अधिकृत रोल आऊटच्या आधी मिळवा विंडोज 11 

तुम्ही आताही त्वरित तुमच्या पीसीवर विंडोज 11 इंस्टॉल करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त विंडोज इन्सायडर प्रोग्राम जॉइन करावा लागेल. या प्रोग्राम अंतगर्त युजर्सना Windows 11 चा अर्ली अ‍ॅक्सेस मिळेल. विंडोज इन्सायडर प्रोग्रॅम द्वारे विंडोज 11 को डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील.   

How to Install Windows 11  

  • सर्वप्रथम तुमच्या पीसीवर Windows बटन दाबून स्टार्ट मेन्यूमध्ये जा   
  • त्यानंतर Settings मध्ये जाऊन Update & Security ची निवड करा.  
  • तिथे डाव्या कोपऱ्यात असलेल्या Windows Insider Program वर क्लिक करा. त्यानंतर Get started सिलेक्ट करा.   
  • त्यानंतर तुमचे रजिस्टर्ड मायक्रोसॉफ्ट अकॉउंट कनेक्ट करा.   
  • त्यानंतर Dev Channel ची निवड करा, बस्स!  
  • आता Windows 11 Insider Preview Builds मिळवण्यासाठी पीसी रिस्टार्ट करा.  
  • पीसी रिस्टार्ट झाल्यावर Update & Security मध्ये Windows 11 इंस्टॉल करण्याचा पर्याय मिळेल.   

Web Title: Windows 11 release date set october 5 no android apps support at launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.