टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 11:11 AM2024-05-02T11:11:09+5:302024-05-02T11:11:30+5:30
Job Cuts in Tech Sector: या कंपन्या मंदीच्या फेऱ्यातून जात असल्याचे सांगितले जात आहे. खर्च कमी करायचा आहे. अनेक प्रोजेक्ट थेट बंद केले जात आहेत.
कोरोनाकाळात जेवढ्या कर्मचाऱ्यांना आघाडीच्या कंपन्यांनी काढले नाही त्या कंपन्यांनी आता नोकरकपात सुरु केली आहे. एप्रिलमध्ये जगातील सर्वात मोठ्या कंपन्या गुगल, अॅप्पल, अमेझॉन सारख्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. यामुळे या कंपन्या मंदीच्या फेऱ्यातून जात असल्याचे सांगितले जात आहे.
या नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आतापर्यंत टेक सेक्टरमदून ७०००० हून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. टेस्लाने देखील हजारो कर्मचाऱ्यांना कमी केले आहे.
अॅप्पलने ६१४ जणांना नोकरीवरून काढले आहे. त्यापूर्वी अॅप्पलने ईलेक्ट्रीक कारचा प्रकल्प गुंडाळला होता. त्या प्रकल्पावरील हे कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गुगलने देखील पायथॉन, फ्लटर आणि डार्ट टीममधील अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. गुगलने इथे पुनर्बांधणीचे कारण दिले आहे. तसेच या कर्मचाऱ्यांकडे कंपनीतील अन्य रिक्त जागांवर अर्ज करण्याची संधी असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे अमेझॉनही आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना काढत आहे. इंटेलनेदेखील कर्मचारी कपात सुरु केली आहे. टेस्लाने देखील आपल्या हजारो कर्माचाऱ्यांना काढले आहे. व्हर्लपूलने आपल्या १००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.