Wipro नं फ्रेशर्सना दिला मोठा झटका, पगारात ५० टक्क्यांची घट; IT यूनियनकडून निंदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 10:12 AM2023-02-22T10:12:36+5:302023-02-22T10:13:27+5:30

Wipro Salary Cut: एका बाजूला टेक आणि आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात करत आहेत.

wipro cut freshers salary by 50 percent after it companies layoff check details | Wipro नं फ्रेशर्सना दिला मोठा झटका, पगारात ५० टक्क्यांची घट; IT यूनियनकडून निंदा

Wipro नं फ्रेशर्सना दिला मोठा झटका, पगारात ५० टक्क्यांची घट; IT यूनियनकडून निंदा

googlenewsNext

Wipro Salary Cut: एका बाजूला टेक आणि आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला विप्रो कंपनीनं एक असं पाऊल उचललं आहे की ज्यामुळे कंपनी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कंपनीत आपल्या पहिल्या नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या फ्रेशर्सना देण्यात येणारा पगार ५० टक्क्यांनी कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे. 

पगारात ५० टक्के कपात करण्याच्या निर्णयावर कामगार संघटना NITES ने विप्रो कंपनीचे हे पाऊल अस्वीकार्य आणि अन्यायकारक असल्याचं म्हटलं आहे. एवढंच नाही तर युनियन NITES ने कंपनीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितलं आहे. 

उद्योगावर लक्ष ठेवणाऱ्या काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कंपनीचा हा निर्णय जागतिक स्तरावर कंपन्यांसमोरील आर्थिक अनिश्चिततेसारख्या आव्हानांचे द्योतक आहे

Wipro Freshers Salary: आधी किती होता पगार?
बंगळुरूस्थित आयटी कंपनी विप्रोने याआधी उमेदवारांशी संपर्क साधून वार्षिक ६.५ लाख रुपयांचे पॅकेज देऊ केले होते, परंतु आता कंपनी त्याऐवजी ३.५ लाख रुपये वार्षिक पगार देणार आहे. उमेदवारांना हा पगार मान्य आहे का, अशी विचारणा केली जात आहे. निवड झालेले उमेदवार कंपनीत नियुक्तीची वाट पाहत होते.

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्थापन केलेल्या NITES या युनियनने विप्रोने उचललेल्या या पावलाचा निषेध केला आहे. NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी कंपनीचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचं म्हटलं आहे आणि ते निष्पक्षता आणि पारदर्शकतेच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचंही म्हटलं आहे. NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा म्हणतात की, कंपनीच्या आर्थिक समस्यांचा बोजा फक्त कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर टाकला जावा हे अस्वीकार्य आहे.

Web Title: wipro cut freshers salary by 50 percent after it companies layoff check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Wiproविप्रो