29 हजारांच्या आत आला शानदार OPPO Reno 7 5G; लूक असा कि लोकांच्या नजरा वळतील तुमच्याकडे
By सिद्धेश जाधव | Published: February 4, 2022 03:38 PM2022-02-04T15:38:52+5:302022-02-04T15:39:17+5:30
Oppo Reno 7 Price In India: ओप्पो रेनो 7 5जी स्मार्टफोन 8GB RAM, 64MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि 4500mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.
OPPO नं भारतात आपल्या Reno 7 Series अंतर्गत दोन दमदार स्मार्टफोन्स सादर केले आहेत. ज्यात Oppo Reno 7 5G आणि Oppo Reno 7 Pro 5G चा समावेश आहे. यातील ओप्पो रेनो 7 5जी स्मार्टफोन 8GB RAM, 64MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि 4500mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या स्टायलिश स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
OPPO Reno 7 5G ची किंमत
OPPO Reno 7 5G स्मार्टफोन भारतात एकाच व्हेरिएंटमध्ये आला आहे. हा फोन 8GB RAM आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. याची किंमत 28,999 रुपये ठेवण्यात आला आहे. या डिवाइसची विक्री 17 फेब्रुवारीपासून केली जाईल. तुम्ही हा फोन Stary Black आणि Startrails Blue कलरमध्ये विकत घेऊ शकता.
स्पेसिफिकेशन्स
OPPO Reno 7 5G मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा अॅमोलेड पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॉर्निंग गोरिल्ला 5 ची सुरक्षा मिळते.
OPPO Reno 7 5G अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12 वर चालतो. या मोबाईलला मीडियाटेक डिमेन्सिटी 900 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर मिळते. सोबत एआरएम माली जी68 जीपीयू देण्यात आला आहे. फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आलं आहे.
Reno 7 स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सोनी आयएमएक्स709 सेल्फी सेन्सरसह लाँच झाला आहे. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. पॉवर बॅकअपसाठी हा ओप्पो फोन 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंगच्या मदतीने काही मिनिटांत चार्ज करता येईल.
हे देखील वाचा:
19GB RAM च्या ताकदीसह OPPO Reno 7 Pro 5G भारतात लाँच; मिळतेय DSLR सारखी कॅमेरा सिस्टम