Twitter इंडियाचे सिनिअर डायरेक्टर मनीष माहेश्वरी यांची बदली, अमेरिकेत दिली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 07:50 PM2021-08-13T19:50:30+5:302021-08-16T18:39:06+5:30
manish maheshwari : ट्विटर इंडियाचे (Twitter India) प्रमुख मनीष माहेश्वरी यांची आता अमेरिकेत बदली झाली असून, तेथे त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने (Twitter) भारतातीलसोशल मीडियावरून सुरू असलेल्या गोंधळादरम्यान मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटर इंडियाचे (Twitter India) प्रमुख मनीष माहेश्वरी यांची आता अमेरिकेत बदली झाली असून, तेथे त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. (witter india manish maheshwari to move to united states as senior director)
अमेरिकेत मनीष माहेश्वरी हे रेव्हेन्यू स्ट्रेटडी अँड ऑपरेशन्सचे सिनिअर डायरेक्टरच्या भूमिकेसह तेथील नवीन मार्केटवर लक्ष केंद्रीत करतील. तसेच, कंपनीच्या ग्लोबल स्ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्सचे ऑपरेशन्सचे सिनिअर डायरेक्टर Deitra Mara यांना ते रिपोर्ट करतील.
मनीकंट्रोलने या निर्णयाच्या घोषणेच्या ईमेलच्या कॉपीचा आढावा घेतला आहे आणि सर्वात आधी ही बातमी दिली. "आमचे भारताचे डायरेक्टर आणि भारतील हेड म्हणून 2 वर्षांहून अधिक काळ टीमला सपोर्ट केल्यानंतर मनीष सॅन फ्रान्सिस्कोमधील सिनिअर डायरेक्टर, रेव्हेन्यू स्ट्रेटडी अँड ऑपरेशन्सवर एक नवीन भूमिका बजावतील, ज्यात नवीन मार्केटवर लक्ष केंद्रीत केले आहे," असे ईमेलमध्ये म्हटले आहे.
कनिका मित्तल आणि नेहा शर्मा कत्याल करतील लीड
ईमेलनुसार, ट्विटरच्या सध्याच्या सेल्स हेड कनिका मित्तल आणि ट्विटरच्या सध्याच्या बिझनेस हेड नेहा शर्मा कत्याल मिळून भारतातील महसूल आणि विक्री विभागाला लीड करतील. तसंट ट्विटर JAPAC/Twitter जपानचे वाइस प्रेसिडेंट यू सासामोटो यांना रिपोर्ट करतील.
सध्या विमान कंपन्यांची उड्डाण क्षमता ६५ टक्क्यांवरून ७२.५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. #aiport#airlines https://t.co/eblvV2rlVb
— Lokmat (@MiLOKMAT) August 13, 2021
यू सासामोटो यांच्याकडून दुजोरा
ट्विटरचे सिनिअर एक्झिक्युटिव्ह यू सासामोटो यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "गेल्या दोन ते दोन वर्षांहून अधिक काळात आमच्या भारतीय व्यवसायाच्या नेतृत्वाबद्दल मनीष महेश्वरी यांचे आभार. अमेरिकेतील वर्ल्डवाइड न्यू मार्केटसाठी रेव्हेन्यू स्ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्स चार्जच्या नवीन भूमिकेबद्दल तुमचे अभिनंदन. ट्विटरसाठी तुम्ही या महत्त्वाच्या पोस्टचे नेतृत्व करता हे पाहून मी उत्सुक आहे."
Thank you to @manishm for your leadership of our Indian business over the past 2+ years. Congrats on your new US-based role in charge of revenue strategy and operations for new markets worldwide. Excited to see you lead this important growth opportunity for Twitter.
— yu-san (@yusasamoto) August 13, 2021
काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हॅन्डल निलंबित
भारतात जेव्हा काँग्रेस आणि ट्विटरमधील वाद विकोपाला गेला असताना मनीष माहेश्वरी यांची बदली करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट निलंबित केल्यानंतर ट्विटरने काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. ट्विटरने थेट काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हॅन्डल निलंबित केले आहे. त्यामुळे ट्विटर आणि काँग्रेस हा वाद भारतात विकोपाला पोहचला आहे. आजच राहुल गांधींनी ट्विटरवर अनेक आरोप केले आहेत.