Twitter पुन्हा डाऊन; लॅपटॉप, डेस्कटॉपवर युझर्सना लॉग इन करण्यात येतेय समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 08:03 AM2022-12-29T08:03:04+5:302022-12-29T08:04:32+5:30

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर पुन्हा डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं.

witter-laptop-and-desktop-users-suffering-major-outrage-worldwide-users-can-not-login-twitter-on-mobile-working-fine | Twitter पुन्हा डाऊन; लॅपटॉप, डेस्कटॉपवर युझर्सना लॉग इन करण्यात येतेय समस्या

Twitter पुन्हा डाऊन; लॅपटॉप, डेस्कटॉपवर युझर्सना लॉग इन करण्यात येतेय समस्या

Next

ट्विटर यूजर्सना पुन्हा एकदा अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्विटर मोबाईलवर काम करत आहे, परंतु लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर काम करणारे युझर्सना त्यांचे अकाऊंट लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. बुधवारी रात्रीपासून युझर्सना अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. युझर्सना डेस्कटॉप किंवा लॅपटॉवरून लॉग इन करताना एरर मेसेज येत आहे. तसंच पुन्हा एकदा लॉग इन करण्यास सांगितलं जात आहे. परंतु पुन्हा लॉग इनचा प्रयत्न केल्यानंतर अन्य सर्व पर्याय गायब होत असल्याची समस्या दिसून येत आहे.

पहिल्यांदा लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर “Something went wrong, but don’t fret — it’s not your fault. Let’s try again.” हा मेसेज दिसत असल्याची तक्रार अनेक युझर्सनं केली आहे. रिफ्रेश केल्यानंतर हा मेसेज पुन्हा दिसतो आणि लॉग इनही होत नाही. लॉग आऊटवर क्लिक केल्यानंतरही पेज लोडिंग सुरू होतं. अनेकदा रिफ्रेश केल्यानंतरही हीच समस्या कायम राहत असल्याची तक्रार काही युझर्सनं केली आहे.

नोटिफिकेशनमध्येही समस्या
रॉयटर्सनुसार आउटरेज ट्रॅकिंग वेबसाईट Downdetector.com नं अमेरिकेत साडेसात वाजेपर्यंत १० हजारांपेक्षा अधिक युझर्सनं ट्विटरच्या समस्येबद्दल सांगितल्याचं म्हटलं. काही युझर्सनं नोटिफिकेशनच्या समस्येबाबतही सांगितलं. काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ४४ बिलियन डॉलर्समध्ये ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतली होती. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्विटर चर्चेत आहे.

Web Title: witter-laptop-and-desktop-users-suffering-major-outrage-worldwide-users-can-not-login-twitter-on-mobile-working-fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Twitterट्विटर