बाबो! Apple Watch ने महिलेला कंगाल बनवलं; एका झटक्यात गायब झाले 30 लाख, जाणून घ्या कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 05:38 PM2022-05-27T17:38:55+5:302022-05-27T17:39:11+5:30
Apple Watch ने एका महिलेला कंगाल बनवलं आहे. तिला मोठा फटका बसल्याची घटना आता समोर आली आहे. या महिलेची जवळपास 31 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
स्मार्टवॉचचा विषय आला की Apple Watch चं नाव सर्वात पहिलं येतं. Apple Watch स्टायलिश डिझाईन आणि जबरदस्त फीचर्ससाठी ओळखलं जातं. परंतु Apple Watch ने एका महिलेला कंगाल बनवलं आहे. तिला मोठा फटका बसल्याची घटना आता समोर आली आहे. या महिलेची जवळपास 31 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. फिरायला गेलेल्या महिलेचं Apple Watch हरवलं आणि काही तासांत तिच्या अकाउंटमधून 40 हजार डॉलर गायब झाले.
अमेरिकेतील एका महिलेने दावा केला आहे, की फ्लोरिडामध्ये डिज्नी वर्ल्डमध्ये एका राइडदरम्यान तिचं Apple Watch हरवलं. त्यानंतरच तिच्या अकाऊंटमधून मोठी रक्कम गायब झाली. डब्ल्यूडीडब्ल्यू्च्या रिपोर्टनुसार, पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत सांगितलं, की तिचं हर्मस एडिशनचं Apple Watch हरवलं. हे वॉच 1300 डॉलरचं होतं. या वॉचसह महिलेचं क्रेडिट कार्ड लिंक होतं. त्या क्रेडिट कार्डची क्रेडिट लाईन अनलिमिटेड होती.
क्रेडिट कार्ड फ्रॉडची बाब लक्षात येताच महिलेने तिचे सर्व कार्ड्स डिएक्टिव्हेट केले. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, Apple Watch मनगटावरुन हटवल्यानंतर ते ऑटोमॅटिक लॉक होतं. लॉक हटवण्यासाठी त्यात पीन टाकावा लागतो. त्यानंतर पेमेंट करता येतं. अशात Apple Watch मुळे क्रेडिट कार्डमध्ये फ्रॉड होण्याची शक्यता कमी होते. सध्या याची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.