JioPhone Next झाला लाँच; जाणून घ्या जगातील सर्वात किफायतशीर स्मार्टफोनची वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: June 24, 2021 06:08 PM2021-06-24T18:08:28+5:302021-06-24T18:09:19+5:30

JioPhone Next price & features: Jio आणि Google ने एकत्र येऊन किफायतशीर 4G स्मार्टफोन JioPhone Next नावाने लाँच केला आहे, हा फोन 10 सप्टेंबरला भारतात उपलब्ध होईल. 

World cheapest smartphone ultra affordable jiophone next created by google points to know  | JioPhone Next झाला लाँच; जाणून घ्या जगातील सर्वात किफायतशीर स्मार्टफोनची वैशिष्ट्ये 

JioPhone Next झाला लाँच; जाणून घ्या जगातील सर्वात किफायतशीर स्मार्टफोनची वैशिष्ट्ये 

Next

Jio आणि Google च्या स्वस्त स्मार्टफोनची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून केली जात होती. गेल्यावर्षी घोषणा केल्यापासून भारतीय ग्राहक या फोनची आतुरतेने वाट बघत होते. अखेरीस आज Reliance Jio ने आपला नवीन स्मार्टफोनवर सादर केला आहे. जियो आणि गुगलच्या भागेदारीत बनलेला हा स्मार्टफोन JioPhone Next नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने Ultra Affordable 4G SmartPhone असे या स्मार्टफोनचे वर्णन केले आहे. जियोफोन नेक्स्ट 10 सप्टेंबरला गणेश चर्तुथीच्या दिवशी भारतात उपलब्ध होईल. चला जाणून घेऊया रिलायन्स जियोच्या या पहिल्या स्मार्टफोनची खासियत 

JioPhone Next ची डिजाईन 

JioPhone Next एखाद्या एंट्री लेवल स्मार्टफोन सारखा दिसतो. बाजारातील लोकप्रिय फोन्सप्रमाणे यात कोणतीही नॉच किंवा पंच-होल मिळत नाही. फोनच्या फ्रंट पॅनलवर वर आणि खालच्या बाजूला रुंद बेजल्स आहेत. वरच्या बेजलमध्ये स्पिकरसह सेल्फी कॅमेरा आणि फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. तसेच फोनच्या मागे सिंगल रियर कॅमेरा सेन्सर फ्लॅश लाईटसह वर्टिकल दिसतो. मागील पॅनलवर मध्यभागी Jio चा लोगो आहे. रियर पॅनलवर तळाला स्पिकर दिसत आहे. तर उजव्या पॅनलवर पावर बटण आणि वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे.  

खास Android OS 

JioPhone Next साठी Google ने आपला Android OS ऑप्टिमाइज केला आहे. या फोनमध्ये Google Assistant, automatic read-aloud of screen text, language translation, smart camera with augmented reality filters असे अँड्रॉइडचे फीचर्स असतील. Google Play Store वरून Facebook, Instagram आणि WhatsApp सारखे लोकप्रिय अ‍ॅप्स देखील डाउनलोड करता येतील. या स्मार्टफोनयामध्ये मराठी, भोजपुरी, बंगाली, तामिळ, तेलूगु, कन्नड, गुजराती व राजस्थानी इत्यादी भारतीय भाषांचा वापर करता येईल. 

JioPhone Next ची किंमत आणि उपलब्धता   

Google आणि जियोच्या JioPhone Next स्मार्टफोनला कंपनीने अल्ट्रा अफॉर्डेबल स्मार्टफोन टॅग दिला आहे. हा फक्त भारतातील नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल, अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे. त्यांनी या स्मार्टफोनची निश्चित किंमत सांगितली नाही. परंतु, अल्ट्रा अफोर्डेबल या शब्दाकडे पाहता हा स्मार्टफोन 3,000 रुपयांच्या आत लाँच केला जाऊ शकतो, अशी अपेक्षा आहे. जियोफोन नेक्स्टची विक्रीभारतात  गणेश चर्तुथीच्या दिवशी म्हणजे 10 सप्टेंबरला सुरु होईल. 

Web Title: World cheapest smartphone ultra affordable jiophone next created by google points to know 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.