जगातील सर्वात सुरक्षित अँड्रॉइड स्मार्टफोन सादर; जाणून घ्या या फोनची वैशिष्ट्ये  

By सिद्धेश जाधव | Published: September 6, 2021 11:51 AM2021-09-06T11:51:57+5:302021-09-06T11:58:21+5:30

World safest android phone: जर्मनीच्या IT सिक्यॉरिटी कंपनी Nitrokey ने NitroPhone 1 नावाचा आपला पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन सादर केला आहे. हा जगातील सर्वात सुरक्षित अँड्रॉइड स्मार्टफोन असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

World safest android phone nitrophone 1 announced price sale specification  | जगातील सर्वात सुरक्षित अँड्रॉइड स्मार्टफोन सादर; जाणून घ्या या फोनची वैशिष्ट्ये  

हा एक मॉडिफाईड पिक्सल 4ए आहे, त्यामुळे NitroPhone 1 चे स्पेसीफाकेशन जास्त वेगळे नाहीत.

googlenewsNext
ठळक मुद्देNitrokey कंपनी एन्क्रिप्टेड यूएसबी स्टिक आणि असेच प्रोडक्ट बाजारात सादर करण्यसाठी ओळखली जाते.हा एक मॉडिफाईड पिक्सल 4ए आहे, त्यामुळे NitroPhone 1 चे स्पेसीफाकेशन जास्त वेगळे नाहीत.

फोन हॅक होणे आणि डेटा लीक होणे या घटना आजच्या डिजिटल युगात रोजच घडत असतात. काही हाय-एन्ड स्मार्टफोन्स प्रायव्हसीला प्राधान्य देण्याचा दावा करतात. अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये कोणतीही कंपनी सुरक्षित स्मार्टफोन सादर करण्याचा दावा करताना दिसत नाही. आता एक असा Android स्मार्टफोन सादर झाला आहे ज्याला हॅकर्स देखील धक्का लावू शकत नाहीत, असा दावा कंपनीने केला आहे. जर्मनीच्या IT सिक्यॉरिटी कंपनी Nitrokey ने NitroPhone 1 नावाचा आपला पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन सादर केला आहे. हा जगातील सर्वात सुरक्षित अँड्रॉइड स्मार्टफोन असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या फोनची किंमत $750 म्हणजे 54,800 रुपयांच्या आसपास आहे.  

Nitrokey कंपनी एन्क्रिप्टेड यूएसबी स्टिक आणि असेच प्रोडक्ट बाजारात सादर करण्यसाठी ओळखली जाते. आता कंपनीने NitroPhone1 स्मार्टफोन सादर करून स्मार्टफोन विश्वात पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे यासाठी कंपनीने नवीन हार्डवेयर बनवला नसून आधीच बाजारात उपलब्ध असलेल्या Pixel 4a मध्ये अँड्रॉइडचा सुरक्षेला प्राधान्य देणारा GrapheneOS इन्स्टॉल केला आहे. म्हणजे यात गुगल सर्व्हिसेस प्री-इन्स्टॉल मिळत नाहीत, तुम्ही त्या नंतर डाउनलोड करू शकता.  

NitroPhone 1 ची वैशिष्ट्ये  

कंपनीने NitroPhone1 स्मार्टफोनमध्ये सुरक्षेची खूप काळजी घेतली आहे. हॅकर्सने कोणत्याही पद्धतीने फोनमधील अ‍ॅप्समधून डिवाइसच्या IMEI आणि सीरियल नंबर, सिम कार्ड सीरियल नंबर, सब्सक्रायबर आयडी, मॅक अ‍ॅड्रेस इत्यादी माहिती अ‍ॅक्सेस करता येणार नाही. कोणी तुमचे बोलणे ऐकू नये यासाठी फोनमधील मायक्रोफोन देखील काढून टाकण्यात आला आहे. ज्या लोकांना आपला डेटा सुरक्षित ठेऊन स्मार्टफोन वापरायचा आहे त्यांच्यासाठी हा फोन सादर करण्यात आला आहे.  

NitroPhone 1 चे स्पेसिफिकेशन 

हा एक मॉडिफाईड पिक्सल 4ए आहे, त्यामुळे NitroPhone 1 चे स्पेसीफाकेशन जास्त वेगळे नाहीत. या फोनमध्ये 19.5:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 5.81 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन GrapheneOS सह लॉन्च केला गेला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट मिळतो . पिक्सल 4ए मध्ये 6जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.  

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, Google Pixel 4a च्या मागे 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. यात एचडीआर+, पोर्टरेट मोड, नाईट साईट, ओआयएस आणि वीडियो स्टेबलाइजेशन असे फीचर्स देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. तसेच, सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Google Pixel 4a मध्ये 3,140mAh ची बॅटरी मिळते.   

Web Title: World safest android phone nitrophone 1 announced price sale specification 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.