नोकियाचा वर्ल्ड रेकॉर्ड; प्रतिस्पर्धी कंपन्यांना धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 11:51 AM2020-05-21T11:51:57+5:302020-05-21T11:57:55+5:30

नोकियानं स्मार्टफोनवर जगातील सर्वात जास्त 5G स्पीड ओवर-द-एयर नेटवर्कवर मिळवल्याचा दावा केला आहे. कंपनीला टेक्सासच्या डल्लासमध्ये सर्वात जास्त 5G कनेक्शन स्पीड मिळाला आहे.

World's Fastest 5G Mobile Internet, Nokia Claims Record vrd | नोकियाचा वर्ल्ड रेकॉर्ड; प्रतिस्पर्धी कंपन्यांना धोबीपछाड

नोकियाचा वर्ल्ड रेकॉर्ड; प्रतिस्पर्धी कंपन्यांना धोबीपछाड

Next
ठळक मुद्देनोकियाचे 1100 असो किंवा 6600 हे मोबाइल ग्राहकांच्या चांगलेच पसंतीस उतरले होते.फिनलँडची टेक कंपनी असलेल्या नोकियानं स्मार्टफोनवर जगातील सर्वात जास्त 5G स्पीड ओवर-द-एयर नेटवर्कवर मिळवल्याचा दावा केला आहे. कंपनीकडून कमर्शियल 5G सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या मदतीने 5G स्पीडची चाचणी घेण्यात आली.

नवी दिल्लीः कधी काळी नोकिया कंपनीच्या मोबाइलची प्रचंड क्रेझ होती. नोकियाचे 1100 असो किंवा 6600 हे मोबाइल ग्राहकांच्या चांगलेच पसंतीस उतरले होते. कालांतरानं नोकिया इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत काहीशी मागे पडल्याचं चित्र निर्माण झालं होतं. पण आता नोकियानं नवाच रेकॉर्ड स्वतःच्या नावे करून घेतला आहे. फिनलँडची टेक कंपनी असलेल्या नोकियानं स्मार्टफोनवर जगातील सर्वात जास्त 5G स्पीड ओवर-द-एयर नेटवर्कवर मिळवल्याचा दावा केला आहे. कंपनीला टेक्सासच्या डल्लासमध्ये सर्वात जास्त 5G कनेक्शन स्पीड मिळाला आहे.

कंपनीकडून कमर्शियल 5G सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या मदतीने 5G स्पीडची चाचणी घेण्यात आली. त्यावेळी आता हा स्पीड 4.7 जीबीपीएसपर्यंत पोहोचला आहे. कंपनीकडून 800MHz कमर्शियल मिलीमीटर वेव 5G स्पेक्ट्रम आणि ड्यूल कनेक्टिविटी (EN-DC)फंक्शनॅलिटीच्या मदतीने या स्पीडची चाचणी घेण्यात आली. EN-DC च्या मदतीने डिव्हाईस लागोपाठ 5G आणि LTE नेटवर्क्सने कनेक्ट होत असल्यानं त्याच्या मदतीने दोन्ही एयर इंटरफेस टेक्नोलॉजीवर डेटा ट्रान्समिट आणि रिसिव्ह केला जाऊ शकतो. याचाच अर्थ डिव्हाईस 5G किंवा LTE ने कनेक्ट होऊन आणखी चांगली सेवा युजर्संना देता येत आहे. 

5Gच्या मदतीने टॉप स्पीड आतापर्यंत डिव्हाईसेसमधून मिळालेला नाही. लवकरच बाकी देशात 5जी स्पेक्ट्रम आणि या संदर्भातील हार्डवेअरमध्ये सुधारणा करून युजर्संना चांगली सुविधा मिळू शकते. रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, 5जी नेटवर्क आधीच्या 4जी नेटवर्कच्या तुलनेत 10 पट अधिक जलद असू शकते. या प्रमाणे 5जी कनेक्शनच्या मदतीने युजर्संना 10Gbps पर्यंत टॉप स्पीड दिला जाऊ शकतो.

गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये हुवेईने 5G स्पीडचा नवीन वर्ल्ड रेकॉर्ड बनवल्याचा दावा केला होता. हुवेईला स्पीड टेस्टवेळी 2.96 जीबीपीएसचा स्पीड मिळाला होता. अनेक टेलिकॉम कंपन्यांकडून 5जी स्पीड टेस्ट करण्यात आली. परंतु नोकियाची टॉप स्पीड बाकीच्या कंपन्यांपेक्षा किती तरी पट अधिक आहे. नोकियाचा एअरस्केल रेडिओ अॅक्सेस इंडस्ट्री लिडिंग आणि कमर्शल अँड-टू-अँड 5जी सोल्युशन आहे. ज्यात ऑपरेटर्स ग्लोबली 5जी स्पेक्ट्रम असेट्सचा वापर करता येणार आहे, असे नोकियाने म्हटले आहे.

हेही वाचा

देशाच्या सार्वभौमत्व अन् प्रादेशिक अखंडतेत कोणतीही तडजोड नाही, भारतानं नेपाळला सुनावलं

पाकला चुना! चिनी कंपन्यांनी 60 अब्जांची गुंतवणूक करून कमावला 400 अब्ज रुपयांचा नफा

...म्हणून चीन अफवा पसरवतो, डोनाल्ड ट्रम्प यांनी साधला निशाणा 

एका कुटुंबाला कचऱ्यात सापडल्या दोन बॅगा अन् उघडून पाहतात तर काय...

CoronaVirus News : चीन अन् इटलीच्या तुलनेत भारतातून येणारा कोरोना 'प्राणघातक', नेपाळच्या PMची टीका

Web Title: World's Fastest 5G Mobile Internet, Nokia Claims Record vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nokiaनोकिया