जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; सॅमसंगचा नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:47 PM2018-11-01T17:47:43+5:302018-11-01T17:48:06+5:30
फोनला 7.8 इंचाची स्क्रीन दिली आहे.
सॅमसंगने गेल्या दोन वर्षांपासून फोल्डेबल स्मार्टफोन बनवित असल्याच्या वावड्या उठविल्या मात्र फोन लाँच करणे काही त्यांना जमलेले नाही. पण अमेरिकेच्या Royole या कंपनीने मात्र दुमडणारा स्मार्टफोन लाँच केला असून असा फोन बनविणारी ती पहिली कंपनी बनली आहे. या फोनचे नाव 'Flexpai' ठेवण्यात आले आहे.
'Flexpai' हा फोन दिसायला टॅब्लेटसारखा आहे. कारण या फोनला 7.8 इंचाची स्क्रीन दिली आहे. ही स्क्रीन दुमडल्यानंतर 4 इंचाची होते.
'Flexpai' हा काही फोल्ड होणारा पहिला फोनच नाही तर या फोनमधील वापरला गेलेला प्रोसेसरही जगात पहिलाच आहे. या फोनमध्ये 7nm जाडीचा स्नॅपड्रॅगन 8150 प्रोसेसर देण्यात आला आहे.
याशिवाय कंपनीने मोबाईल चार्जिंगसाठी आरओ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या द्वारे बॅटरी 0 ते 80 टक्के केवळ तासाभरात चार्ज होते.
केवळ एकाच बाजुला कॅमेरे
सध्या 3- 4 कॅमेरे देण्याची स्पर्धा लागली असताना या फोनमध्ये केवळ एकाच बाजुला कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी 16 मेगापिक्सल आणि सेकंडरी 20 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.