सुपर फास्ट 5G वाला पहिला फोन OnePlus चा; 6T पेक्षा असेल महागडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 01:39 PM2018-12-07T13:39:54+5:302018-12-07T13:40:51+5:30
OnePlus च्या नवीन फोनमध्ये Qualcomm चा लेटेस्ट प्रोसेसर वापरला जातो.
नवी दिल्ली : चीनची परवडणाऱ्या श्रेणीमध्ये प्रिमिअम स्मार्टफोन देणारी कंपनी OnePlus जगातील पहिला 5G फोन आणणार आहे. क्वालकॉमने नुकताच Snapdragon 855 हा 5G सुविधा देणार प्रोसेसर लाँच केला. यावेळी अमेरिकेतील कार्यक्रमात OnePlus चे मुख्य कार्यकारी अधिकारी पेटे लाउ यांनी ही घोषणा केली आहे. OnePlus ने 5 वर्षांत जागतिक बाजारात चांगला जम बसविला आहे.
महत्वाचे म्हणजे OnePlus च्या नवीन फोनमध्ये Qualcomm चा लेटेस्ट प्रोसेसर वापरला जातो. OnePlus सहा महिन्यांमध्ये एक फोन लाँच करते. यामुळे पुढील फोन हा 5जी सेवा देणारा असेल. Qualcomm चा Snapdragon 855 हा प्रोसेसर 7nm या तंत्रज्ञानावर काम करतो. हे तंत्रज्ञान सध्या अॅपल आणि ह्युवाईकडे आहे.
लाऊ यांनी सांगितले की, OnePlus चा पुढील स्मार्टफोन हा 5जी सपोर्ट करणारा असेल. जो सध्याच्या OnePlus 6T च्या तुलनेत 200 ते 300 डॉलर म्हणजेच 14 ते 21 हजार रुपये महाग असणार आहे. मात्र, किंमत ही आमच्या ग्राहकांसाठी समस्या असणार नाही, कारण त्यांना 5जी ने युक्त असलेला फोन मिळणार आहे. या फोनला स्वस्त किंमतीत विकणे परवडणारे नाही. कारण सध्याच्या फोनमध्ये यासाठी मोठे बदल आवश्यक असणार आहेत.