जगातला पहिला पाण्यावर तरंगणारा स्मार्टफोन !
By admin | Published: October 21, 2016 12:13 AM2016-10-21T00:13:18+5:302016-10-21T00:13:18+5:30
स्मार्टफोन जगत दिवसेंदिवस हायटेक होत चालले असून त्यात काळानूसार बदल होत आहेत. संशोधकांनी आतापर्यंत स्मार्टफोनच्या स्वरुपात अमुलाग्र बदल केला असून अजून एका नव्या संशोधनाने पाण्यावर तरंगणारा स्मार्टफोन तयार करुन मोबाईल क्रांतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. एक प्रसिद्ध कंपनी लवकरच हा स्मार्टफोन लॉँच करणार आहे. यात असणारे फिचर्स हायटेक असून त्यात सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यात टाकल्यावरही तो बुडणार नाही. लगेच पाण्यावर येऊन तरंगेल. कंपनीने या स्मार्टफोनची प्रीबुकिंग ऑफिशिअल वेबसाईटवर सुरु केली आहे.
Next
स मार्टफोन जगत दिवसेंदिवस हायटेक होत चालले असून त्यात काळानूसार बदल होत आहेत. संशोधकांनी आतापर्यंत स्मार्टफोनच्या स्वरुपात अमुलाग्र बदल केला असून अजून एका नव्या संशोधनाने पाण्यावर तरंगणारा स्मार्टफोन तयार करुन मोबाईल क्रांतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. एक प्रसिद्ध कंपनी लवकरच हा स्मार्टफोन लॉँच करणार आहे. यात असणारे फिचर्स हायटेक असून त्यात सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यात टाकल्यावरही तो बुडणार नाही. लगेच पाण्यावर येऊन तरंगेल. कंपनीने या स्मार्टफोनची प्रीबुकिंग ऑफिशिअल वेबसाईटवर सुरु केली आहे.स्वस्तात उपलब्ध३२ जीबी आणि ६४ जीबी या दोन व्हेरायंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे. या दोन्ही मॉडेलवर ४०% डिस्काऊंट ऑफर देण्यात आली आहे. ३२ जीबी मॉडेलची किंमत सुमारे १६,००० तर ६४ जीबी व्हेरायंटची किंमत सुमारे १९,००० रुपये आहे. डिस्प्ले :यात ४.७ इंचचे फूल एचडी स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन आणि सॅमसंगच्या डिस्प्लेपेक्षा हा चांगला असल्याचा कंपनीचा दावा आहे.प्रोसेसर आणि रॅम :या स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल २ जीएचझेड ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आले आहे. अल्ट्रा-फास्ट टेक्नोलॉजीवर हा काम करतो. यासह ४ जीबी रॅम देण्यात आले आहे. मल्टीटास्किंगसाठी हा एक चांगला फोन आहे.ऑपरेटिंग सिस्टिम :ॲँड्रॉईडच्या ५.१ मार्शमेलो ऑपरेस्टिंग सिस्टिमवर हा फोन काम करेल. पण ही ओएस पुढे अपडेट करता येईल की नाही याची माहिती दिलेली नाही.कॅमेरा :या स्मार्टफोनमध्ये 16 एमपी रियर आणि फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. ऑटोफोकस एलईडी फ्लॅशसह हा फोन येतो. हाय क्वालिटी पिर्स घेण्यासह एचडी व्हिडिओ रेकॉडिंर्गसाठी याचा वापर करता येऊ शकतो.मेमरी :३२ जीबी आणि ६४ जीबी या दोन मेमरी व्हेरायंटमध्ये हा स्मार्टफोन लॉंचच केला आहे. मायक्रो एसडी कार्ड लावून याची मेमरी वाढवता येऊ शकते.सेक्युरिटी :सेक्युरिटीसाठी यात मिलिटरी ग्रेड २५६ बिट एईएस व्हाइस कम्युनिकेशन देण्यात आले आहे. थ्रीजी, फोरजी, आणि वायफाय नेटवर्क वर हे काम करते.सिम :ड्युअल सिम असलेल्या हा स्मार्टफोन एलटीई आणि जीएसएम या दोन्ही बॅंडवर काम करतो. यात फोरजी इंटरनेट वापरता येईल.