25 वर्ष जुन्या गेमसाठी तब्बल 11 कोटींची बोली; Super Mario बनला जगातील सर्वात महागडा गेम
By सिद्धेश जाधव | Published: July 13, 2021 01:01 PM2021-07-13T13:01:16+5:302021-07-13T13:01:49+5:30
Super Mario 64 auction: Heritage Auctions वर Super Mario 64 चा लिलाव झाला होता, ज्यात गेमची 25 वर्ष जुनी sealed copy 15,00,000 यूएस डॉलरला विकली गेली.
सध्या आपल्या आयुष्यात स्मार्टफोन्सनी अनेक गोष्टींची जागा घेतली आहे. अगदी घड्याळ आणि अलार्म पासून ते टीव्ही आणि गेमिंग कन्सोल पर्यंत. अशा अनेक गोष्टींची जागा कमी जास्त प्रमाणात आपल्या हातातील या तबकडीने घेतली आहे. परंतु जुन्या आठवणींची जागा स्मटफोन घेऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. याचे एक उदाहरण अमेरिकेतून समोर आले आहे. 90 च्या दशकातील व्हिडीओ गेम कॅसेट्ससाठी एका माणसाने कोटींची बोली लावली आहे. या माणसाने 90’s मधील सुपरहिट Super Mario 64 Game ची sealed copy (सीलबंद प्रत) विकत घेतली आहे. आणि आपली ही आवड पूर्ण करण्यासाठी या व्यक्तीने $1.5 Million म्हणजे 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली आहे. (Super Mario 64 sells for more than $1.5m at auction)
गेमवर लाखो खर्च करणाऱ्या लोकांची उदाहरणे सध्या काही उदाहरणे मिळू शकतात, परंतु एवढी रक्कम खर्च करणारा हा पहिलाच व्यक्ती आहे. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार अमेरिकन मल्टी-नॅशनल ऑक्शन हाउस, Heritage Auctions वर हा ऐतिहासिक सौदा झाला आहे. रविवारी या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ गेम Super Mario 64 चा लिलाव झाला होता, ज्यात गेमची 25 वर्ष जुनी sealed copy विकली जात होती. या लिलावात गेमची किंमत 15,00,000 यूएस डॉलर निश्चित झाली. म्हणजे 25 वर्ष जुना गेम 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकत घेण्यात आला.
11 कोटी रुपयांमध्ये विकलेल्या गेलेल्या ‘मारियो’ गेमला Wata 9.8 A++ रेटिंग मिळाली आहे. या लिलावानंतर Super Mario 64 जगातील सर्वात महाग गेम बनला आहे. यापूर्वी हा विक्रम The Legend of Zelda गेमच्या नावावर होता, हा गेम $870,000 मध्ये विकला गेला आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात महागड्या टॉप 5 गेम्सच्या यादीत Super Mario Bros. च्या चार वेगवेगळ्या व्हर्जन्सचा समावेश आहे.