WWDC 2023: iPhone झाला जुना! Apple ने लाँच केला Vision Pro ऑग्मेंटेड रिअलिटी हेडसेट, पाहा किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 12:48 PM2023-06-06T12:48:41+5:302023-06-06T12:49:19+5:30

पाहा काय आहे खास, यामुळे स्मार्टफोनचा वापर कमी होणार असल्याचं म्हटलं जातंय.

WWDC 2023 iPhone is old Apple launches Vision Pro augmented reality headset see price and features | WWDC 2023: iPhone झाला जुना! Apple ने लाँच केला Vision Pro ऑग्मेंटेड रिअलिटी हेडसेट, पाहा किंमत आणि फीचर्स

WWDC 2023: iPhone झाला जुना! Apple ने लाँच केला Vision Pro ऑग्मेंटेड रिअलिटी हेडसेट, पाहा किंमत आणि फीचर्स

googlenewsNext

सध्या आपण अनेक कामांसाठी स्मार्टफोनवर अवलंबून आहोत. परंतु तंत्रज्ञान सातत्यानं बदलत असतं. असाच एक बदल आता पुन्हा होताना दिसतोय. आता अ‍ॅपलनं आपला VR हेडसेट Vison Pro लाँच केलाय. याच्यामुळे स्मार्टफोनचा वापर कमी होऊ शकतो अशा शक्यता वर्तवण्यात येतायत.

सद्यस्थितीत आपण शॉपिंगपासून फिल्म्स पाहण्यापर्यंत किंवा व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनचाच वापर करतो. परंतु येणाऱ्या काळात व्हिडीओ कॉलिंग, शॉपिंग, ट्रॅव्हलिंग आणि व्हर्चुअल मीटिंगसह चित्रपट पाहण्यासाठीही VR हेडसेटचा वापर केला जाईल.

काय आहे Apple Vison Pro?
हा एक व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेट आहे. हा तुमच्या चष्म्याप्रमाणे असतो आणि तुम्ही सहजरित्या त्याचा वापर करू शकता. यामध्ये एका डिस्प्लेसोबतच अनेक सेन्सर्सचा वापर केला आहे. यासोबत त्यात कॅमेरा, स्पीकर आणि चिपसेटचा वापर केला जातो. यामुळेच तो एका स्मार्टफोन प्रमाणे काम करण्यास सक्षम आहे. स्मार्टफोनमध्ये होणारी बहुतांश कामं याद्वारे केली जातात.

Apple Vision Pro नव्या युगाची सुरुवात
दरम्यान, अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी व्हिजन प्रो हेडसेट लाँच करताना ही नव्या युगाची सुरूवात असल्याचं म्हटलं. हा एक नव्या प्रकारचा कम्प्युटर आहे, जो युझरला रिअ‍ॅलिटी आणि व्हर्च्युअल स्पेसला मर्जची सुविधा देणार असल्याचंही त्यांनी WWDC 2023 मध्ये सांगितलं.

काय आहे खास?
याचा वापर करताना युझरला व्हर्च्युअल जगतासह सामान्य कामंही करता येऊ शकतात. हे एक अतिशय शक्तिशाली एंटरटेंनमेंट आणि कम्युनिकेशन टुल असेल. यासोबतच तुम्ही शॉपिंगही करू शकाल. यात व्हर्च्युअल रुममध्ये व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा असेल. दरम्यान, हा सामान्य व्हीआर हेडसेटपेक्षा निराळा असेल असं अ‍ॅपलनं नमूद केलंय.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?
Apple Vision Pro मध्ये कर्व्ह्ड ग्लासचा वापर करण्यात आलाय. यामध्ये अ‍ॅपलच्या हार्डवेअरचा वापर करण्यात आलाय. याशिवाय यात R1 सिलिकॉन चिपचा वापर केला असून या डिव्हाइसचा बॅटरी बॅकअप २ तासांचा आहे. यात ऑप्टीकल आयडीचा वापर करण्यात आलाय. याद्वारे युझरच्या रॅटिनाला स्कॅन करून डिव्हाईस अनलॉक होणार आहे. यात visionOS चा वापर करण्यात आलाय.

किंमत किती?
अ‍ॅपल व्हिजन प्रो सध्या विक्रीसाठी उपलब्ध नाही. पुढील वर्षी हा व्हीआर हेडसेट विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो. याची किंमत ३९९९ डॉलर्स म्हणजेच जवळपास २.८८ लाख आहे.

Web Title: WWDC 2023 iPhone is old Apple launches Vision Pro augmented reality headset see price and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल