वैज्ञानिकांचा अविश्वसनीय आविष्कार; हा रोबोट चक्क बाळही जन्माला घालू शकतो!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 02:52 PM2021-11-30T14:52:18+5:302021-11-30T14:53:12+5:30
Xenobots 2020 मध्ये पहिल्यांदा समोर आणण्यात आले होते. त्यांचा आकार खूपच लहान आहे. यानंतर प्रयोगांनी दाखवून दिले की ते ('जिवंत रोबोट') चालू शकतात, समूहांमध्ये एकत्रितपणे काम करू शकतात, स्वतःला बरे करू शकतात आणि अन्नाशिवायही अनेक दिवस जगू शकतात.
अमेरिकेतील वैज्ञानिकांनी जगातील पहिला 'जिवंत रोबोट' (Living Robots) तयार केला आहे. एवढेच नाही, तर हा रोबोट प्रजनाचे कामही करू शकतो, असेही या वैज्ञानिकांने म्हटले आहे. 'जिवंत रोबोट्स'नाच झेनोबॉट्स (Xenobots) असेही म्हटले जाते. शास्त्रज्ञांनी आफ्रिकन बेडकांच्या स्टेम सेलचा (Frog Stem Cells) वापर करून जगातील पहिला 'जिवंत, स्व-उपचार करणारा' रोबोट बनवला आहे.
Xenobots 2020 मध्ये पहिल्यांदा समोर आणण्यात आले होते. त्यांचा आकार खूपच लहान आहे. यानंतर प्रयोगांनी दाखवून दिले की ते ('जिवंत रोबोट') चालू शकतात, समूहांमध्ये एकत्रितपणे काम करू शकतात, स्वतःला बरे करू शकतात आणि अन्नाशिवायही अनेक दिवस जगू शकतात.
वैज्ञानिकांचा दावा -
आता ज्या वैज्ञानिकांनी Xenobots ला व्हर्मोंट विद्यापीठ (University of Vermont), टफ्ट्स विद्यापीठ (Tufts University) आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या (Harvard University) व्हायस इंस्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल इंस्पायर्ड इंजिनिअरिंगमध्ये विकसित केले, त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी प्राणी अथवा वनस्पतींपेक्षाही एक वेगळी जैविक प्रजननाची पद्धत शोधून काढली आहे. ही पद्धत अथवा रूप विज्ञानासाठी कुठल्याही स्वरुपापेक्षा भिन्न आहे.
'जिवंत रोबोट' -
हा रोबोट Xenobots बॉयोलॉजिकल रोबोटचे अपडेटेड व्हर्जन आहे. ज्याचे गेल्या वर्षी अनावरण करण्यात आले. शास्त्रज्ञांनी बेडकाच्या स्टेम सेलचा वापर करून हा जिवंत रोबोट तयार केला आहे. हा अतिशय छोटा रोबोट एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकतो.