शाओमीचा सर्वात हलका 5G फोन होणार भारतात लाँच; Xiaomi 11 Lite 5G NE होऊ शकतो या महिन्यात सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 11:42 AM2021-09-09T11:42:40+5:302021-09-09T11:51:08+5:30
Xiaomi 11 Lite 5G NE स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
जूनमध्ये Xiaomi Mi 11 Lite 4G स्मार्टफोन भारतात सादर करण्यात आला होता. कंपनीने हा फोन भारतातील सर्वात स्लिम (पातळ) स्मार्टफोन म्हणून मार्केट केला होता. या फोनच्या लाँच इव्हेंटच्या शेवटी कंपनीने 5G व्हेरिएंटचे संकेत दिले होते. आता 91मोबाईल्सने माहिती दिली आहे कि शाओमीच्या या स्मार्टफोनचा 5G व्हेरिएंट म्हणजे Xiaomi 11 Lite 5G NE (New Edition) या महिन्यात भारतात लाँच केला जाऊ शकतो.
पब्लिकेशनने अचूक तारीख सांगितली नाही. परंतु येत्या काही दिवसांत या स्मार्टफोनच्या लाँच डेटची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी Xiaomi 11 Lite 5G NE स्मार्टफोन IMEI डेटाबेसमध्ये दिसला होता, त्यामुळे या लाँचची शक्यता अजून वाढली आहे. हा फोन याआधी जागतिक बाजारात सादर झाला आहे. या स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G चिपसेट दिला जाऊ शकतो.
Xiaomi 11 Lite 5G NE स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 11 Lite 5G NE जागतिक बाजारात लाँच झाला आहे, त्यामुळे या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा फोन 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह सादर करण्यात आला आहे. हा फोन Android 11 आधारित MIUI 12 वर चालतो.
Xiaomi 11 Lite 5G NE स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. यात 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये कंपनीने 5G/4G, dual-band Wi-Fi, Bluetooth, GPS सह USB Type-C पोर्ट असे पर्याय दिले आहेत.
Xiaomi 11 Lite 5G NE मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स मिळते. हा फोन 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये कंपनीने 4,250mAh ची बॅटरी दिली आहे.