स्वस्त झाला सुपरफास्ट चार्जिंग असलेला Xiaomi चा 5G फोन; 25 हजारांपेक्षा जास्तीची बचत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 05:03 PM2022-06-15T17:03:51+5:302022-06-15T17:04:15+5:30
Xiaomi 11i 5G स्मार्टफोनवर 5 हजारांची सूट तर मिळतेय सोबत अन्य ऑफर 20,500 रुपयांची अतिरिक्त सूट देत आहेत.
शाओमीनं आपल्या लोकप्रिय आणि प्रीमियम 5G स्मार्टफोनची अर्थात Xiaomi 11i 5G ची किंमत कमी केली आहे. 8GB RAM, 67W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट आणि 5160mAh बॅटरी असलेला हा स्मार्टफोन 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. परंतु इथेच ही सूट थांबत नाही, तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून आणखी बचत करू शकता.
Xiaomi 11i 5G वर पाच हजार रुपयांची सूट मिळवण्यासाठी तुम्हाला आयसीआयसीआय बँकेच्या कार्डनं पेमेंट करावं लागेल. त्यामुळे फोनचा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी असलेला बेस मॉडेल 24,999 रुपयांची ऐवजी 19,999 रुपयांमध्ये मिळेल. फोन एक्सचेंज ऑफरमध्ये घेतल्यास तुम्ही Mi Exchange स्कीममध्ये 16,500 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. तसेच शाओमीच्या या फोनवर 4 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे.
Xiaomi 11i 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स
शाओमी 11आय 5जी मध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 1200निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड मीयुआय 3.0 वर चालतो. तसेच मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेट आणि माली जी68 जीपीयू प्रोसेसिंगची जबाबदारी सांभाळतात. सोबत LPDDR4x RAM आणि UFS2.2 स्टोरेज देण्यात आली आहे.
स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा सॅमसंग एचएम2 सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सीरिजची सर्वात मोठी खासियत बॅटरी सेगमेंट आहे. तसेच Xiaomi 11i स्मार्टफोनमध्ये 5,060एमएएच बॅटरी 67वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.