चर्चा तर होणारच! येतोय फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होणारा Xiaomi फोन, किंमतीही समजली
By सिद्धेश जाधव | Published: December 30, 2021 03:06 PM2021-12-30T15:06:14+5:302021-12-30T15:06:42+5:30
Xiaomi 11i HyperCharge: Xiaomi 11i HyperCharge स्मार्टफोन भारतात मीडियाटेकच्या Dimensity 920 प्रोसेसरसह सादर केला जाईल.
Xiaomi नं चीनमध्ये आपली सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज Xiaomi 12 सादर केली आहे. या सीरिज अंतर्गत तीन जबराट मोबाईल्स आले आहेत. हे फोन्स भारतात कधी येतील हे माहिती नाही, परंतु लवकरच देशात Xiaomi 11i HyperCharge स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. स्वतः कंपनीनं याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
शाओमीनं हा स्मार्टफोन भारतात 6 जानेवारीला लाँच केला जाईल, असं सांगितलं आहे. तसेच लाँचपूर्वीच स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स देखील टीज केले आहेत. Xiaomi 11i HyperCharge स्मार्टफोन भारतात मीडियाटेकच्या Dimensity 920 प्रोसेसरसह सादर केला जाईल. तसेच आता कंपनीचे अधिकारी रघु रेड्डी यांनी इंडिया टुडेला सांगितलं कि, Xiaomi 11i HyperCharge स्मार्टफोन भारतात 25,000 ते 30,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत सादर केला जाऊ शकतो.
Xiaomi 11i HyperCharge चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 11i HyperCharge स्मार्टफोन Redmi Note 11 Pro+ चा भारतीय व्हर्जन असेल. या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी 120W fast charging सपोर्टसह देण्यात येईल. जी फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होईल, असा दावा कंपनीनं केला आहे. यात 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि पंच होल डिजाईनसह सादर करण्यात आला आहे. हा शाओमी फोन ऑक्टकोर मीडियाटेक डिमेंसीटी 920 चिपसेटसह बाजारात येईल. त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी Xiaomi 11i HyperCharge मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 108-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. हा फोन ड्युअल सिमेट्रिक JBL-ट्यून स्टिरिओ स्पीकरसह येईल. जे डॉल्बी अॅटमॉस आणि हाय-रेज ऑडिओला सपोर्ट करतात. कनेक्टिव्हिटीसाठी या फोन्समध्ये NFC, GPS, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक मिळतो. यात IP53 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स आणि VC लिक्विड कुलिंग देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
Jio युजर्सनी इकडे लक्ष द्या! या 7 चुका तुम्हाला करू शकतात 'कंगाल', आताही वेळ आहे
शेवटचा दिवस! फक्त 975 रुपयांमध्ये iPhone विकत घेण्याची संधी, फ्लिपकार्ट देतंय तगडा डिस्काउंट