ठरलं तर! 120W HyerCharge फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह ‘हा’ शाओमी फोन येणार बाजारात
By सिद्धेश जाधव | Published: September 6, 2021 05:06 PM2021-09-06T17:06:26+5:302021-09-06T17:08:49+5:30
Xiaomi 11T Pro Launch: शाओमीने Xiaomi 11T Pro स्मार्टफोनचा एक टीजर व्हिडीओ चुकून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओमधून Xiaomi 11T Pro स्मार्टफोनमधील 120W HyperCharge टेक्नॉलॉजीची माहिती समोर आली होती.
गेले काही दिवस Xiaomi च्या Xiaomi 11T स्मार्टफोन सीरिजची माहिती लिक्स आणि लिस्टिंग्समधून समोर येत होती. आता या सीरिजचा जागतिक लाँच इव्हेंट 15 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे, असे कंपनीने सांगितले आहे. या इव्हेंटमधून या सीरिजमधील Xiaomi 11T आणि Xiaomi 11T Pro हे दोन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोन जगासमोर ठेवण्यात येतील. परंतु त्याहीपेक्षा महत्वाची बातमी म्हणजे या सीरिजमधील Xiaomi 11T Pro स्मार्टफोनमध्ये 120W HyperCharge सपोर्ट दिला जाऊ शकतो.
शाओमीने Xiaomi 11T Pro स्मार्टफोनचा एक टीजर व्हिडीओ चुकून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओमधून Xiaomi 11T Pro स्मार्टफोनमधील 120W HyperCharge टेक्नॉलॉजीची माहिती समोर आली होती. तसेच हा फोन 15 सप्टेंबरला सादर केला जाईल, असे देखील सांगण्यात आले होते. परंतु आता हा व्हिडीओ कंपनीने डिलीट केला आहे. कंपनीने गेल्यावर्षी 120W HyperCharge टेक्नॉलॉजी लाँच करून 4,000mAh बॅटरी असलेला Mi 10 Ultra स्मार्टफोनमध्ये फक्त 8 मिनिटांत फुल चार्ज करण्याचा दावा केला होता.
So officially Confirmed...
— Debayan Roy (Gadgetsdata) (@Gadgetsdata) September 5, 2021
Xiaomi 11T Pro with 120W 😍🔥 wired charging !!
Global launch 15th September.#Xiaomi11TPro#Xiaomihttps://t.co/1hIIFC7iLhpic.twitter.com/o7rtbBAKXn
Xiaomi 11T आणि 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 11T आणि Xiaomi 11T Pro कंपनीच्या शाओमी ब्रॅंडिंगसह बाजारात दाखल होतील. आधीच्या फ्लॅगशिप प्रमाणे हे फोन्स एमआय ब्रॅंडिंग अंतर्गत येणार नाहीत. Xiaomi 11T सीरिजची डिजाईन Mi 11X सारखी असू शकते. हे दोन्ही फोन 8GB RAM आणि 128GB/ 256GB स्टोरेजसह बाजारात उपलब्ध होतील. Xiaomi 11T Pro स्मार्टफोनमध्ये 120Hz ओएलईडी डिस्प्ले, Snapdragon 888 चिपसेट आणि 120W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. तर 11T मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह एलसीडी डिस्प्ले, Mediatek प्रोसेसर आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.