Xiaomi 12: आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली Xiaomi स्मार्टफोन लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर
By सिद्धेश जाधव | Published: December 28, 2021 09:54 PM2021-12-28T21:54:04+5:302021-12-28T21:54:51+5:30
Xiaomi 12: Xiaomi नं आपल्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro सादर केले आहेत.
Xiaomi 12: Xiaomi नं आपल्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीजमध्ये Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. गेले कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर हे फोन्स अखेरीस बाजारात आले आहेत. चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका इव्हेंटमधून कंपनीनं Qualcomm Snapdragon 8Gen 1 प्रोसेसरसह येणारा हा पहिला स्मार्टफोन सादर केला आहे. या लेखात आपण वॅनिला शाओमी 12 ची माहिती घेणार आहोत.
Xiaomi 12 चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 12 या फ्लॅगशिप फोनमध्ये 6.28 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले कर्व्ड डिजाइन, सेंटर अलाइंड पंच-होलसह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं यात 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येणार हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसच्या सुरक्षेसह बाजारात आला आहे.
हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर चालतो. या फोनमध्ये डॉल्बी अॅटमॉस आणि डॉल्बी विजनसह Harman Kardon speakers मिळतील. Xiaomi 12 मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC मिळतो. फोन 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेजसह बाजारात आला आहे. या फोनमध्ये कंपनीनं 4,500mAh ची बॅटरी, 67W फास्ट वायर्ड चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिवर्स वायरलेस चार्जिंगसह दिली आहे.
फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50MP चा Sony IMX 766 सेन्सर प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जो OIS (ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन) फीचरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 13MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 5MP चा सुपर मॅक्रो कॅमेरा मिळेल. फोन 3x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
किंमत
- Xiaomi 12 8GB/128GB: 3699 युआन (जवळपास 43,480 रुपये)
- Xiaomi 12 8GB/256GB: 3999 युआन (जवळपास 46,884 रुपये)
- Xiaomi 12 12GB/256GB: 4399 युआन (जवळपास 51,5574 रुपये)