वनप्लसचा बंदोबस्त करण्याचा Xiaomi चा डाव; मिड रेंजमध्ये होऊ शकते जबरदस्त Xiaomi 12 Lite ची एंट्री
By सिद्धेश जाधव | Published: March 26, 2022 03:29 PM2022-03-26T15:29:16+5:302022-03-26T15:31:03+5:30
Xiaomi 12 Lite स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो.
Xiaomi 12 सीरीज गेल्यावर्षी चीनमध्ये सादर करण्यात आली होती. या सीरिजमध्ये फ्लॅगशिप दर्जाच्या Xiaomi 12X, Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro स्मार्टफोन्सची आतापर्यंत एंट्री झाली आहे. परंतु आता या सीरिजमध्ये एका मिडरेंज स्मार्टफोनचा देखील समावेश केला जाईल. हा फोन Xiaomi 12 Lite नावानं ग्राहकांच्या भेटीला येईल. अशी माहिती बेंचमार्किंग साईट गीकबेंचच्या डेटाबेसमधून समोर आली आहे.
Xiaomi 12 Lite गीकबेंच लिस्टिंग
Xiaomi 12 Lite स्मार्टफोन बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर साईट गीकबेंचवर 2203129G या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. या स्मार्टफोनला गिकबेंचच्या सिंगल कोर टेस्टमध्ये 788 आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 2864 पॉईंट्स मिळाले आहेत. या लिस्टिंगमधून Xiaomi 12 Lite च्या काही प्रोसेसर, जीपीयू आणि ऑपरेटिंग सिस्टमची माहिती मिळाली आहे.
लीक स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 12 Lite स्मार्टफोन 2.4GHz स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह सादर केला जाईल. या प्रोसेसरला ‘Taoyao‘ कोडनेम देण्यात आलं आहे, जो Qualcomm Snapdragon 778G असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 642L GPU मिळेल. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. इथे या डिवाइसचा 8GB रॅम व्हेरिएंट लिस्ट करण्यात आला आहे.
लिक्स आणि रिपोर्ट्समधून याआधी देखील Xiaomi 12 Lite ची माहिती समोर आली आहे. ज्यात Full HD+ AMOLED चा उल्लेख आहे, जो 1080 × 2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाईल. या फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यात मुख्य कॅमेऱ्याची जागा Samsung ISOCELL GW3 सेन्सरला मिळू शकते.