लाँचपूर्वीच शक्तिशाली Xiaomi 12 हे फोटोज आले समोर; देणार का सॅमसंगच्या अल्ट्रा प्रीमियम फोन्सना मात?
By सिद्धेश जाधव | Published: November 1, 2021 12:49 PM2021-11-01T12:49:34+5:302021-11-01T12:49:42+5:30
Xiaomi 12 India Launch: Xiaomi 12 स्मार्टफोनच्या इमेजेस चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर शेयर करण्यात आल्या आहेत. या फोटोजमधून या फोनच्या डिजाईन आणि लूकची माहिती मिळाली आहे.
गेल्या आठवड्यात शाओमीने भारतातात पॉवरफुल Mi 11 Ultra ची विक्री बंद केली आहे. आता या फोनची जागा आगामी फ्लॅगशिप Xiaomi 12 स्मार्टफोन घेणार आहे. आता या फोनच्या इमेजेस चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर शेयर करण्यात आल्या आहेत. या फोटोजमधून या फोनच्या डिजाईन आणि लूकची माहिती मिळाली आहे.
कथित Xiaomi 12 स्मार्टफोन एका प्रोटेक्टिव्ह केसमध्ये दिसत आहे. हा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन कर्व डिस्प्ले, पंच होल सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केला जाईल. या फोटोजमुळे हा फ्लॅगशिप स्मार्टफोनचा लाँच नजीक असल्याचा अंदाज लावला जात आहे. याआधी हा शाओमी फोन यावर्षी डिसेंबरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले होते.
Xiaomi 12 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
लिक्स आणि रिपोर्ट्समधून Xiaomi 12 ची माहिती समोर आली आहे. त्यानुसार या फोनमध्ये LTPO डिस्प्ले अॅडेप्टिव रिफ्रेश रेटसह देण्यात येईल. यात Qualcomm Snapdragon 898 चिपसेट मिळेल. त्याचबरोबर 12GB पर्यंतचा LPDDR5x RAM आणि 512GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज देण्यात येईल. हा मोबाईल Android 12 आधारित MIUI वर चालेल. तसेच यातील 5000mAh ची बॅटरी 120W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
मिळलेल्या दिलेल्या माहितीनुसार आगामी Xiaomi फ्लॅगशिप सीरीजमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल. त्याचबरोबर 50MP चा अल्ट्रावाईड सेन्सर आणि 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे सेन्सर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह येतील. तसेच यात 1920fps स्लो मोशन व्हिडीओ शूट करण्याचा पर्याय मिळेल.