पॉवरफुल Xiaomi 12 ची लाँच डेट आली समोर; शक्तिशाली चिपसेट आणि 100W चार्जिंगसह होणार लाँच
By सिद्धेश जाधव | Published: November 12, 2021 05:48 PM2021-11-12T17:48:35+5:302021-11-12T17:48:43+5:30
Xiaomi 12 Launch Date: Xiaomi 12 मध्ये क्वॉलकॉमचा आगामी स्नॅपड्रॅगन 898 चिपसेट देण्यात येईल. त्यामुळे हा फोन Qualcomm’s Tech Summit 2021 इव्हेंटनंतर लाँच केला जाऊ शकतो.
टेक विश्वात Xiaomi 12 ची आतुरतेने वाट बघितली जात आहे. कारण हा फोन क्वॉलकॉमच्या लेटेस्ट फ्लॅगशिप प्रोसेसरसह बाजारात येणार आहे. हा कंपनीच्या आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन प्रोसेसर असणार आहे. आता हा स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे. चीनी स्मार्टफोन कंपनीने आतापर्यंत शाओमी 12 ची लाँच डेट सांगितली नाही, परंतु आता हा फोन कधी लाँच होईल याचा अंदाज लागला आहे.
Xiaomi 12 Launch Date
शाओमीचा आगामी फ्लॅगशिप फोन Qualcomm’s Tech Summit 2021 च्या नंतर लगेचच बाजारात येईल, अशी माहिती एका रिपोर्टमधून मिळाली आहे. हा इव्हेंट 30 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत सुरु राहील आणि या इव्हेंटमध्ये Snapdragon 898 चिपसेट लाँच केला जाऊ शकतो. Qualcomm चा हा इव्हेंट संपल्यावर शाओमीचा इव्हेंटचे आयोजित केला जाईल. त्यामुळे 2 डिसेंबरनंतर Xiaomi 12 लाँच होऊ शकतो. हा फोन Snapdragon 898 SoC सह लाँच होणारा पहिला फोन असेल.
Xiaomi 12 चे लीक स्पेसिफिकेशन्स
आगामी फ्लॅगशिप Xiaomi 12 फोन Qualcomm च्या सर्वात पॉवरफुल Snapdragon 898 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. हा एक 4nm फॅब्रिकेशनवर बनलेला चिपसेट आहे. हा मोबाईल Android 12 आधारित MIUI वर चालेल. तसेच यातील 5000mAh ची बॅटरी 100W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात येईल. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट LPDDR5X RAM रॅम दिला जाऊ शकतो.
या फोनमध्ये कंपनी 50MP चे तीन कॅमेरा सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देऊ शकते, ज्यात 50MP टेलीफोटो व अल्ट्रा वाईड लेन्सचा समावेश असेल. हे सेन्सर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह येतील. तसेच यात 1920fps स्लो मोशन व्हिडीओ शूट करण्याचा पर्याय मिळेल.
काही दिवसांपूर्वी Xiaomi 12 स्मार्टफोनचे काही लाईव्ह फोटो लीक झाले होते. त्यानुसार, हा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन कर्व डिस्प्ले, पंच होल सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केला जाईल. या फोटोजमुळे हा फ्लॅगशिप स्मार्टफोनचा लाँच नजीक असल्याचा अंदाज लावला जात आहे. याआधी हा शाओमी फोन यावर्षी डिसेंबरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले होते.