Xiaomi चा 'हा' छोटुसा स्मार्टफोन देणार iPhone ला टक्कर; अशी असेल आगामी कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोनची डिजाईन
By सिद्धेश जाधव | Published: February 3, 2022 04:07 PM2022-02-03T16:07:04+5:302022-02-03T16:07:13+5:30
Xiaomi 12 mini: Xiaomi 12 mini च्या नावावरून हा एका छोटासा कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल, असे वाटत आहे.
Xiaomi नं गेल्यावर्षी चीनमध्ये आपली Xiaomi 12 ही फ्लॅगशिप सीरीज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये Xiaomi 12, Xiaomi 12X, आणि Xiaomi 12 Pro असे तीन मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. यापेक्षा शक्तिशाली Xiaomi 12 Ultra देखील कंपनी सादर करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती. तर आता एका नवीन लीकमध्ये दावा करण्यात आला आहे कि कंपनी Xiaomi 12 mini स्मार्टफोनवर देखील काम करता आहे.
Xiaomi 12 mini
टिपस्टर Shadow_Leak नं ट्वीटरवरून एका शाओमीस्मार्टफोनचे रेंडर शेयर केले आहेत. हे रेंडर्स आगामी Xiaomi 12 mini स्मार्टफोनचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या लीकनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल. ज्यात रिण कॅमेरा सेन्सर व्हर्टिकली एका रांगेत असतील आणि शेजारी LED फ्लॅश मिळेल. खालच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात Xiaomi ची ब्रँडिंग दिली जाऊ शकते.
Xiaomi 12 mini च्या नावावरून हा एका छोटासा कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल, असे वाटत आहे. त्यामुळे यात कंपनी 6-इंचाचा छोटा डिस्प्ले देऊ शकते. हा Xiaomi 12 सीरिजमध्ये येत असल्यामुळे यात फ्लॅगशिप फीचर्स आणि स्पेक्स मिळतील अशी अपेक्षा आहे. या सीरिजमधील काही फोन्सची तुलना कंपनीनं लाँचच्या वेळी आयफोन सोबत केली होती. त्यामुळे आगामी शाओमी 12 मिनी देखील अॅप्पलच्या आयफोन्सना टक्कर देऊ शकतो.
हे देखील वाचा:
- WhatsApp: खुशखबर! दोन दिवसानंतर देखील Delete करता येणार पाठवलेले मेसेज; कंपनीनं ऐकली युजर्सची मागणी
- Best Smart TV Under 20000: हे आहेत 20 हजारांच्या आत येणारे बेस्ट स्मार्ट टीव्ही; Flipkart Sale मध्ये मिळतायत जबरदस्त ऑफर्स