बिनधास्त फिरा जगभर! Xiaomi फोनवर 1 लाखाचे ट्रॅव्हल व्हाउचर मोफत, 10 हजार रुपयांचा डिस्काउंटही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:05 AM2022-05-16T11:05:39+5:302022-05-16T11:05:53+5:30
Xiaomi 12 Pro स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच कंपनी ट्रॅव्हल व्हाउचर देखील मोफत देत आहे.
Xiaomi सतत आपल्या भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दमदार स्मार्टफोन्स सादर करत असते. हे फोन्स विकण्यासाठी आकर्षक ऑफर्स देखील समोर येत असतात. आता अलीकडेच आलेल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 12 Pro वर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. तसेच ग्राहकांना ट्रॅव्हल व्हाउचर देखील मोफत मिळणार आहेत.
Xiaomi 12 Pro वरील ऑफर्स आणि डील्स
शाओमीच्या अधिकृत वेबसाईटवर Xiaomi 12 Pro 5G स्मार्टफोन 6 हजार रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह विकत घेता येईल. यासाठी ICICI बँकेच्या कार्डचा वापर करावा लागेल. तसेच चेकआउट करताना देखील 4 हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट कंपनी देत आहे. दोन्ही ऑफर्समुळे हा प्रीमियम स्मार्टफोन 10 हजार रुपयांनी स्वस्त होईल.
परंतु इथेच ही ऑफर थांबत नाही. कंपनी Xiaomi 12 Pro 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर ट्रॅव्हल व्हाउचर देखील देत आहे. हा फोन विकत घेणाऱ्या ग्राहकांना मेक माय ट्रिपकडून 1 लाख रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर जिंकण्याची संधी दिली जात आहे. या व्हाउचर्सचा वापर देशात आणि परदेशात फिरण्यासाठी करता येईल. या ऑफरची माहिती तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवरून मिळवू शकता.
Xiaomi 12 Pro चे स्पेसिफिकेशन्स
शाओमी 12 प्रो स्मार्टफोनमध्ये 3200 × 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.73 इंचाचा 2के डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 480 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा ई5 अॅमोलेड एलटीपीओ 2.0 पॅनल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कोर्निंग गोरिल्ला विक्टसच्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. हा फोन 10बिट कलर आणि 1500निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी शाओमी 12 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स707 7पी लेन्स मुख्य सेन्सरचे काम करते. सोबत 50 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि 50 मेगापिक्सलचाची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
पावर बॅकअपसाठी Xiaomi 12 Pro मध्ये 4,600एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. यातील 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला हा फोन मिनिटांत फुल चार्ज करेल. हा फोन फक्त 18 मिनिटांत 0 ते 100 टक्के पर्यंत चार्ज होईल, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच हा डिवाइस 50वॉट वायरलेस चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
Xiaomi 12 Pro लेटेस्ट अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित नव्या कोऱ्या मीयुआय 13 वर चालतो. 3 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टकोर प्रोसेसरसह 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट या शाओमी 12 प्रो चा सर्वात मोठा आकर्षण बिंदू आहे. हा फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.