120W चार्जिंग, 12GB RAM सह आला तगडा 5G Phone; Xiaomi 12 Pro देणार आयफोनला धोबीपछाड?  

By सिद्धेश जाधव | Published: December 29, 2021 11:52 AM2021-12-29T11:52:09+5:302021-12-29T11:52:28+5:30

Xiaomi 12 Pro: Xiaomi 12 Pro स्मार्टफोन चीनमध्ये 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 120hz रिफ्रेश रेट आणि 120W फास्ट चार्जिंग अशा एकापेक्षा एक स्पेसिफिकेशन्ससह लाँच करण्यात आला आहे.

Xiaomi 12 Pro launched with 120w charging and Snapdragon 8 Gen 1 chip   | 120W चार्जिंग, 12GB RAM सह आला तगडा 5G Phone; Xiaomi 12 Pro देणार आयफोनला धोबीपछाड?  

120W चार्जिंग, 12GB RAM सह आला तगडा 5G Phone; Xiaomi 12 Pro देणार आयफोनला धोबीपछाड?  

Next

Xiaomi 12 series अंतर्गत कंपनीनं तीन फोन सादर केले आहेत. हे दोन फोन्स सादर करून शाओमीनं 2021 चा शेवट धडाकेबाज केला आहे. सीरीज अंतगर्त Xiaomi 12, Xiaomi 12 Pro आणि Xiaomi 12X असे तीन मॉडेल आले आहेत. यातील शाओमी 12 प्रो फक्त नावानं नव्हे तर फीचर्स, स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत देखील ‘प्रो’ आहे. चला जाणून घेऊया या फोनची किंमत.  

Xiaomi 12 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Xiaomi 12 Pro लेटेस्ट अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित नव्या कोऱ्या मीयुआय 13 वर चालतो. 3 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टकोर प्रोसेसरसह 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट या शाओमी 12 प्रो चा सर्वात मोठा आकर्षण बिंदू आहे. हा फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. 

फोटोग्राफीसाठी शाओमी 12 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स707 7पी लेन्स मुख्य सेन्सरचे काम करते. सोबत 50 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि 50 मेगापिक्सलचाची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.  

शाओमी 12 प्रो स्मार्टफोनमधील डिस्प्ले देखील शानदार आहे. यात 3200 × 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.73 इंचाचा 2के डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 480 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा ई5 अ‍ॅमोलेड एलटीपीओ पॅनल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कोर्निंग गोरिल्ला विक्टसच्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. हा फोन 10बिट कलर आणि 1500निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो.  

पॉवर बॅकअपसाठी Xiaomi 12 Pro मध्ये 4,600एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. यातील 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला हा फोन मिनिटांत फुल चार्ज करेल. हा फोन फक्त 15 मिनिटांत 0 ते 100 टक्के पर्यंत चार्ज होईल, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच हा डिवाइस 50वॉट वायरलेस चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. 

Xiaomi 12 Pro ची किंमत 

  • Xiaomi 12 Pro 8GB/128GB: 4699 युआन (जवळपास 55,000 रुपये)  
  • Xiaomi 12 Pro 8GB/256GB: 4999 युआन (जवळपास 58,600 रुपये)  
  • Xiaomi 12 Pro 12GB/256GB: 5399 युआन (जवळपास 63,290 रुपये)  

सध्या चीनमध्ये आलेला हा फोन लवकरच जागतिक बाजारात सादर केला जाईल.  

हे देखील वाचा: 

Xiaomi 12: आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली Xiaomi स्मार्टफोन लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर

Samsung युजर्स सावधान! अधिकृत अ‍ॅप स्टोरच करतंय धोकादायक अ‍ॅप्सचा प्रसार; अशाप्रकारे सुरक्षित ठेवा स्मार्टफोन

Web Title: Xiaomi 12 Pro launched with 120w charging and Snapdragon 8 Gen 1 chip  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.