100W च्या वेगवान फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो Xiaomi 12; स्पेसीफाकेशन्स झाले लीक 

By सिद्धेश जाधव | Published: November 9, 2021 04:58 PM2021-11-09T16:58:19+5:302021-11-09T16:58:27+5:30

Xiaomi 12 Launch: Xiaomi 12 स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सिस्टम आणि 50MP टेलीफोटो व अल्ट्रा वाईड लेन्स असलेला कॅमेरा सेटअप देण्यात येईल.

Xiaomi 12 specifications leaked 100w fast charging 50mp triple rear camera system  | 100W च्या वेगवान फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो Xiaomi 12; स्पेसीफाकेशन्स झाले लीक 

100W च्या वेगवान फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो Xiaomi 12; स्पेसीफाकेशन्स झाले लीक 

googlenewsNext

शाओमी आपला आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनवर काम करत आहे. हा फोन लवकरच Xiaomi 12 नावाने ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. आता टिपस्टर Digital Chat Station ने या आगामी स्मार्टफोनची माहिती शेयर केली आहे. त्यानुसार, Xiaomi 12 स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सिस्टम आणि 50MP टेलीफोटो व अल्ट्रा वाईड लेन्स असलेला कॅमेरा सेटअप देण्यात येईल.  

Xiaomi 12 चे लीक स्पेसिफिकेशन्स 

आगामी फ्लॅगशिप Xiaomi 12 फोन Qualcomm च्या सर्वात पॉवरफुल Snapdragon 898 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. हा एक 4nm फॅब्रिकेशनवर बनलेला चिपसेट आहे. हा मोबाईल Android 12 आधारित MIUI वर चालेल. तसेच यातील 5000mAh ची बॅटरी 100W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात येईल. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट LPDDR5X RAM रॅम दिला जाऊ शकतो. 

या फोनमध्ये कंपनी 50MP चे तीन कॅमेरा सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देऊ शकते, ज्यात 50MP टेलीफोटो व अल्ट्रा वाईड लेन्सचा समावेश असेल. हे सेन्सर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह येतील. तसेच यात 1920fps स्लो मोशन व्हिडीओ शूट करण्याचा पर्याय मिळेल. 

काही दिवसांपूर्वी Xiaomi 12 स्मार्टफोनचे काही लाईव्ह फोटो लीक झाले होते. त्यानुसार, हा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन कर्व डिस्प्ले, पंच होल सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केला जाईल. या फोटोजमुळे हा फ्लॅगशिप स्मार्टफोनचा लाँच नजीक असल्याचा अंदाज लावला जात आहे. याआधी हा शाओमी फोन यावर्षी डिसेंबरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले होते.  

Web Title: Xiaomi 12 specifications leaked 100w fast charging 50mp triple rear camera system 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.