50MP पेरिस्कोप लेन्ससह येणार दमदार Xiaomi 12; लाँच होण्याआधीच कॅमेरा सेटअपची माहिती लीक  

By सिद्धेश जाधव | Published: August 31, 2021 01:14 PM2021-08-31T13:14:21+5:302021-08-31T13:15:13+5:30

Xiaomi 12 Camera Setup: Xiaomi 12 हा कंपनीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल. Mix 4 प्रमाणे हा देखील MI ऐवजी शाओमी ब्रँडिंगसह सादर केला जाईल.  

Xiaomi 12 tipped with 50mp triple rear camera and 5x periscope lens | 50MP पेरिस्कोप लेन्ससह येणार दमदार Xiaomi 12; लाँच होण्याआधीच कॅमेरा सेटअपची माहिती लीक  

50MP पेरिस्कोप लेन्ससह येणार दमदार Xiaomi 12; लाँच होण्याआधीच कॅमेरा सेटअपची माहिती लीक  

googlenewsNext
ठळक मुद्देXiaomi 12 स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात. 50MP च्या पेरिस्कोप लेन्सला सपोर्ट करणारा Xiaomi 12 पहिलाच स्मार्टफोन असू शकतो.

Xiaomi आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 12 ची तयारी करत आहे. हा फोनदेखील Mix 4 प्रमाणे MI ऐवजी शाओमी ब्रँडिंगसह बाजारात सादर केला जाईल. आता या स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपमधील सेन्सर्सची माहिती समोर आली आहे. लीकनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला जाईल. ज्यात तीन 50MP चे सेन्सर असतील. यात अल्ट्रा वाईड सेन्सर आणि पेरिस्कोप लेन्सचा समावेश असू शकतो.  

Xiaomi 12 मधील कॅमेरा सेटअप 

प्रसिद्ध चीनी टिप्स्टर Digital Chat Station ने Xiaomi 12 मधील कॅमेरा सेटअपची माहिती विबोवर शेयर केली आहे. त्यानुसार Xiaomi 12 स्मार्टफोनमध्ये 50MP चे तीन कॅमेरा सेन्सर मिळू शकतात. ज्यात मुख्य कॅमेरा, अल्ट्रा वाईड लेन्स आणि टेलीफोटो लेन्सचा समावेश असेल. तसेच कंपनी 10x पेरिस्कोप लेन्सवर देखील काम करत आहे, असे टिपस्टरने सांगितले आहे. परंतु, Xiaomi 12 मधील 50MP च्या टेलीफोटो लेन्ससह 5x पेरिस्कोप लेन्स मिळू शकते.  

असा कॅमेरा सेटअप खूप कमी स्मार्टफोन्समध्ये मिळतो. 50MP च्या पेरिस्कोप लेन्सला सपोर्ट करणारा Xiaomi 12 पहिलाच स्मार्टफोन असू शकतो. कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे हे स्पेक्स कितीही प्रभावित करणारे असले तरी जोपर्यंत हा फोन बाजारात येत नाही तोपर्यंत यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही.  

मिळणार लेटेस्ट स्पेसिफिकेशन्स 

Xiaomi 12 स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात. ज्यात नवीन LPDDR5X रॅमचा समावेश असले. या टेक्नॉलॉजीची घोषणा JEDEC कंपनीने काही महिन्यांपूर्वी केली आहे. तसेच या फोनमध्ये Qualcomm चा आगामी फ्लॅगशिप प्रोसेसर मिळू शकतो. क्वॉलकॉमने अजून या प्रोसेसरची घोषणा केली नाही. या वर्षाच्या अखेर हा प्रोसेसर आल्यास पुढील वर्षाच्या सुरुवातीला Xiaomi 12 ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो.  

Web Title: Xiaomi 12 tipped with 50mp triple rear camera and 5x periscope lens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.