Xiaomi 12 Ultra चे दोन जबराट व्हेरिएंट येणार बाजारात; सर्वात वेगवान प्रोसेसरची मिळणार जोड
By सिद्धेश जाधव | Published: November 20, 2021 01:08 PM2021-11-20T13:08:31+5:302021-11-20T13:09:12+5:30
XIaomi 12 Ultra Launch: XIaomi 12 Ultra चा अजून एक व्हेरिएंटची आता माहिती समोर आली आहे. जो सर्वात वेगवान Qualcomm Snapdragon 898 प्रोसेसर आणि 50MP च्या कॅमेरा सेटअपसह बाजारात येऊ शकतो.
XIaomi 12 Ultra नावाचा फोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो, हा एक प्रीमियम फ्लॅगशिप फोन असेल. या फोनमध्ये सर्वात वेगवान Qualcomm Snapdragon 898 प्रोसेसर मिळू शकतो. तसेच फोनमध्ये 50MP चा कॅमेरा सेटअप मिळेल. परंतु आता या फोनच्या अजून एका व्हेरिएंटची देखील माहिती मिळाली आहे. जो Xiaomi 12 Ultra Enhanced Edition नावाने बाजारात येईल. या दोन फोन्सना मार्व्हल कॅरेक्टर्स Thor आणि Loki असे कोडनेम देण्यात आले आहेत.
शाओमीचे हे दोन्ही फ्लॅगशिप फोन Qualcomm Snapdragon 898 चिपसेटसह बाजारत येतील. तसेच 30 नोव्हेंबरला आयोजित होणाऱ्या Qualcomm Tech Summit मध्ये हे फोन सादर केले जाऊ शकतात. याआधी ही सीरिज 2022 मध्ये सादर केली जाईल, असे रिपोर्ट्स आले होते. कंपनीने मात्र अजूनही या फोनच्या लाँच डेट किंवा स्पेक्सची माहिती दिली नाही.
Xiaomi 12 Ultra Enhanced Edition
Xiaomi 12 Ultra आणि Xiaomi 12 Ultra Enhanced Edition चे सोर्स कोड्स MIUI मध्ये दिसले आहेत, अशी माहिती Xiaomiui ब्लॉगने दिली आहे. हे फोन Qualcomm च्या आगामी फ्लॅगशिप चिपसेट Snapdragon 898 सह सादर केले जातील, हा चिपसेट Snapdragon 8 gen1 नावाने सादर केला जाऊ शकतो.
फोनमध्ये फुल एचडी प्लस LTPO डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. फोन 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच यात Android 12 आधारित MIUI असेल. Xiaomi 12 Ultra मधील कॅमेऱ्याची माहिती काही दिवसांपूर्वी लीक झाली होती. त्यानुसार हा फोन एका अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केला जाऊ शकतो. तसेच यात 50MP चे तीन सेन्सर बॅक पॅनलवर मिळू शकतात.