सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनच्या लाँचसाठी फक्त काही दिवस शिल्लक; ‘ही’ कंपनी करणार कमाल
By सिद्धेश जाधव | Published: June 25, 2022 05:58 PM2022-06-25T17:58:52+5:302022-06-25T17:59:04+5:30
शक्तिशाली Xiaomi 12 Ultra स्मार्टफोनच्या लाँचची तारीख लीक झाली आहे, पुढील महिन्यात येऊ शकतो ग्राहकांच्या भेटीला.
स्वस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाणाऱ्या शाओमीनं गेल्या काही वर्षांपूर्वी रणनीती बदलली आहे. कंपनी प्रीमियम आणि अल्ट्रा प्रीमियम सेगमेंटमध्ये देखील सक्रिय झाली आहे. असाच एक अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोन Xiaomi 12 Ultra लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. आता लिक्समधून या शक्तिशाली स्मार्टफोनच्या लाँच डेटची माहिती लीक झाली आहे.
Xiaomi 12 Ultra ची लाँच डेट
TechGoing च्या रिपोर्टनुसार, Xiaomi 12 Ultra स्मार्टफोन पुढील महिन्याच्या सुरुवातीला ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. Xiaomi 12 Ultra चीनमध्ये 5 जुलैला लाँच केला जाऊ शकतो. 28 जूनपासून कंपनी या फोनसंबंधित टीजर्स प्रसारित करू शकते. शाओमीनं मात्र Xiaomi 12 Ultra च्या लाँच डेट बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
Xiaomi 12 Ultra चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
शाओमीनं कन्फर्म केलं आहे की, Xiaomi 12 Ultra स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 SoC प्रोसेसर असेल. जो क्वॉलकॉमचा लेटेस्ट फ्लॅगशिप चिपसेट आहे. तसेच Xiaomi 12S Series देखील या प्रोसेसरसह लाँच होऊ शकते. रिपोर्टनुसार या हँडसेटमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Xiaomi 12 Ultra कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन असेल जो Leica कॅमेऱ्यासह येईल. काही रिपोर्ट्सनुसार यात एक क्वॉड-रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50MP चा Sony IMX989 मेन कॅमेरा, 48MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि दोन पेरिस्कोप कॅमेरा सेन्सर्स असू शकतात. फोनमध्ये 6.6-इंचाचा कर्व्ड अॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो. तसेच यात 12GB RAM आणि 512GB स्टोरेज मिळू शकते.