आयफोनलाही लाजवेल Xiaomi चा Smartphone; 15 मिनिटांत फुल चार्ज होणार सर्वात शक्तिशाली डिवाइस  

By सिद्धेश जाधव | Published: March 9, 2022 01:00 PM2022-03-09T13:00:39+5:302022-03-09T13:01:22+5:30

Xiaomi आपला आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीच्या फ्लॅगशिप सीरिजमध्ये अजून Xiaomi 12 Ultra ची एंट्री बाकी आहे.  

Xiaomi 12 Ultra Specifications And Renders Revealed 5000mah Battery 120w Charging Support Check Specifications  | आयफोनलाही लाजवेल Xiaomi चा Smartphone; 15 मिनिटांत फुल चार्ज होणार सर्वात शक्तिशाली डिवाइस  

प्रतीकात्मक फोटो

Next

Xiaomi नं गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आपली Xiaomi 12 सीरिज सादर केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीनं काही मॉडेल सादर केले परंतु सर्वांना अपेक्षित असलेला Xiaomi 12 Ultra मात्र लाँच झाला नाही. आता बातमी आली आहे कि हा फोन आगामी स्नॅपड्रॅगन 8 Gen 1+ SoC बाजारात येईल. तसेच टिपस्टर @Shadow_leaks नं या आगामी फ्लॅगशिप डिवाइसचे काही स्पेक्स आणि कॉन्सेप्ट रेंडर्स लीक केले आहेत.  

Xiaomi 12 Ultra चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

लिक्सनुसार, Xiaomi 12 Ultra स्मार्टफोन 6.73-इंचाच्या 2K E5 AMOLED डिस्प्लेसह बाजारात येईल. हा डिस्प्ले LTPO 2.0 टेक्नॉलॉजीसह 10 बिट कलरला सपोर्ट करेल, तसेच यात 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. टिपस्टरनं मात्र याआधी आलेल्या रिपोर्ट्सच्या विपरीत या स्मार्टफोनमधील स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 SoC ची माहिती दिली आहे.  

हा फोन अँड्रॉइड 12 आधारित MIUI वर चालेल. यात IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स मिळेल आणि स्टीरियो स्पिकर देखील देण्यात येतील. रिपोर्ट्सनुसार, या स्मार्टफोनमध्ये 50MP चा Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा आणि 50MP चा Sony IMX766 अल्ट्रावाईड कॅमेरा मिळेल. तसेच Xiaomi 12 Ultra मध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात येईल.  

हे देखील वाचा:

Web Title: Xiaomi 12 Ultra Specifications And Renders Revealed 5000mah Battery 120w Charging Support Check Specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.