जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर मिळणार Xiaomi 12 Ultra मध्ये; पुढील महिन्यात ग्राहकांच्या भेटीला?
By सिद्धेश जाधव | Published: June 22, 2022 05:03 PM2022-06-22T17:03:57+5:302022-06-22T17:04:31+5:30
Xiaomi 12 Ultra स्मार्टफोन लवकर ग्राहकांच्या भेटीला Xiaomi 12S आणि Xiaomi 12S Pro सह येऊ शकतो. ज्याची माहिती आता समोर आली आहे.
Xiaomi 12 सीरिज गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये सादर करण्यात आली होती. त्यानंतर या लाईनअपमधील हँडसेट जगभरात सादर करण्यात आले. आता या सीरिजचा विस्तार होणार असल्याच्या बातम्या येऊ लागली आहेत. जुलैमध्ये Xiaomi 12 Ultra स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. Xiaomi चे CEO Lei Jun यांनी टीज केलं आहे की, आगामी शाओमी फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येईल.
Lei Jun यांनी शाओमीच्या अपकमिंग Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येणाऱ्या स्मार्टफोनचे नाव सांगितले नाहीत. परंतु हा डिवाइस Xiaomi 12 Ultra असू शकतो, असा अंदाज लावला जात आहे. Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर गेल्या महिन्यात Qualcomm द्वारे लाँच करण्यात आला आहे, जो गेल्यावर्षीच्या Snapdragon 8 Gen 1 चा अपग्रेड व्हर्जन आहे. शाओमी 12 अल्ट्रा सोबत Xiaomi 12S आणि Xiaomi 12S Pro देखील लाँच होऊ शकतात.
Xiaomi 12 Ultra ची डिजाईन
Xiaomi 12 Ultra फोनच्या लीक रेंडरमधून हा फोन कसा दिसेल, याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार फोनच्या बॅक पॅनलवर मोठा कॅमेरा मॉड्यूल मिळेल. यात कॅमेरा सेन्सरसाठी अनेक कटआउट देण्यात आले आहेत. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असेल, जो Leica ब्रँडिंगसह येईल.
Xiaomi 12S चे संभाव्य स्पेक्स
गिकबेंच लिस्टिंगनुसार, फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरसह बाजारात येईल, ज्याच्या चार कोरचा क्लॉक स्पीड 2.02 GHz आणि तीन कोरचा क्लॉक स्पीड 2.75GHz आहे. त्यामुळे हा आगामी शाओमी फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येईल अशी चर्चा आहे. तसेच फोनमध्ये 12GB RAM मिळू शकतो.
Xiaomi 12S फोनच्या 3C लिस्टिंगमधून 67W फास्ट चार्जिंग स्पीडची माहिती देखील मिळाली आहे. तसेच Xiaomi 12S Pro फोन 120W फास्ट चार्जिंगसह येईल. हे फोन्स बाजारात नक्कीच रियलमीच्या जीटी सीरिज, वनप्लस फ्लॅगशिप आणि सॅमसंगच्या टॉप एन्ड स्मार्टफोन्सना टक्कर देतील.