Xiaomi करणार शक्तिप्रदर्शन! जगातील सर्वात वेगवान प्रोसेसर असलेला स्मार्टफोन करणार सादर 

By सिद्धेश जाधव | Published: December 1, 2021 06:40 PM2021-12-01T18:40:48+5:302021-12-01T18:41:08+5:30

Xiaomi 12 Series: Xiaomi 12 हा Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह बाजारात येणारा जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असेल. याबाबतीत शाओमी सॅमसंग, रियलमी आणि मोटोरोलाला मात देऊ शकते.

Xiaomi 12 will be the worlds first smartphone to have snapdragon 8 gen 1 processor  | Xiaomi करणार शक्तिप्रदर्शन! जगातील सर्वात वेगवान प्रोसेसर असलेला स्मार्टफोन करणार सादर 

Xiaomi करणार शक्तिप्रदर्शन! जगातील सर्वात वेगवान प्रोसेसर असलेला स्मार्टफोन करणार सादर 

Next

Xiaomi नं सॅमसंगसह अन्य सर्वच अँड्रॉइड स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांना मात देण्याची तयारी केली आहे. कंपनीनं Qualcomm Snapdragon 8 Gen 1 5G चिपसेटसह येणाऱ्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. हा आजच आलेला क्वॉलकॉमचा नवा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. जो जुन्या प्रोसेसरच्या तुलनेत 30 टक्के जास्त वेगवान आहे. क्वालकॉमच्या या फ्लॅगशिप चिपसेटची घोषणा होताच Xiaomi नं कंपनी सर्वप्रथम Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर असलेला फोन सादर करेल, असं सांगितलं. हा फोन बाजारात Xiaomi 12 नावानं दाखल होईल.  

Xiaomi नं आपली आगामी फ्लॅगशिप Xiaomi 12 series मधील स्मार्टफोनचा लाँच टीज करण्यास सुरुवात केली आहे. या सीरिज अंतर्गत Xiaomi 12, Xiaomi 12 Pro, Xiaomi 12X, Xiaomi 12X Pro, Xiaomi 12 Ultra, आणि Lite असे फोन सादर केले जाऊ शकतात. कंपनीचा इतिहास पाहता सर्वप्रथम ही सीरिज चीनमध्ये येईल. त्यांनतर भारतासह जागतिक बाजारात हे फोन्स सादर केले जातील.  

Xiaomi 12 सीरीज चीनमध्ये याच महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये लाँच होऊ शकते. अचूक तारीख समोर आली नाही परंतु लीकमधून कंपनी या वर्षअखेर ही सीरिज सादर करू शकते, असं सांगण्यात आलं आहे. परंतु जागतिक बाजारातील ग्राहकांना पुढील वर्षाची वाट बघावी लागू शकते. कंपनी पहिल्या तिमाहीत ही सीरिज जागतिक बाजारात लाँच करेल.  

Web Title: Xiaomi 12 will be the worlds first smartphone to have snapdragon 8 gen 1 processor 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.