12GB RAM सह येतोय Xiaomi 12S; रियलमीला धक्का देण्यासाठी पुरेल का ताकद?  

By सिद्धेश जाधव | Published: June 15, 2022 01:29 PM2022-06-15T13:29:58+5:302022-06-15T13:30:06+5:30

Xiaomi 12S फोनची माहिती लीक झाली आहे, हा 12GB RAM, Snapdragon प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो.  

Xiaomi 12s with snapdragon 8 plus gen1 soc 12gb ram spotted on geekbench  | 12GB RAM सह येतोय Xiaomi 12S; रियलमीला धक्का देण्यासाठी पुरेल का ताकद?  

12GB RAM सह येतोय Xiaomi 12S; रियलमीला धक्का देण्यासाठी पुरेल का ताकद?  

googlenewsNext

Xiaomi नं आपली फ्लॅगशिप Xiaomi 12 सीरिज गेल्यावर्षीच जागतिक बाजारात आणि काही महिन्यांपूर्वी भारतात सादर केली आहे. आता या सीरिजमधील आणखी दोन स्मार्टफोन्सची माहिती येण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच Xiaomi 12S आणि Xiaomi 12S Pro ग्राहकांच्या भेटीला येणार आहेत. यातील शाओमी 12एस फोन आता बेंचमार्किंग साईट Geekbench वर दिसला आहे.  

91mobiles च्या रिपोर्टनुसार, Xiaomi 12S फोन मॉडेल नंबर 2206123SC सह गीकबेंचवर दिसला आहे. या लिस्टिंगच्या माध्यमातून फोनच्या ऑपरेटिंग सिस्टम, रॅम आणि प्रोसेसरची माहिती मिळाली आहे. गीकबेंचच्या टेस्टमध्ये फोनला सिंगल कोरमध्ये 1328 तर मल्टी-कोरमध्ये 4234 पॉईंट्स मिळाले आहेत.  

Xiaomi 12S चे संभाव्य स्पेक्स 

गिकबेंच लिस्टिंगनुसार, फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरसह बाजारात येईल, ज्याच्या चार कोरचा क्लॉक स्पीड 2.02 GHz आणि तीन कोरचा क्लॉक स्पीड 2.75GHz आहे. त्यामुळे हा आगामी शाओमी फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येईल अशी चर्चा आहे. तसेच फोनमध्ये 12GB RAM मिळू शकतो. 

Xiaomi 12S फोनच्या 3C लिस्टिंगमधून 67W फास्ट चार्जिंग स्पीडची माहिती देखील मिळाली आहे. तसेच Xiaomi 12S Pro फोन 120W फास्ट चार्जिंगसह येईल. हे फोन्स बाजारात नक्कीच रियलमीच्या जीटी सीरिज, वनप्लस फ्लॅगशिप आणि सॅमसंगच्या टॉप एन्ड स्मार्टफोन्सना टक्कर देतील.  

Web Title: Xiaomi 12s with snapdragon 8 plus gen1 soc 12gb ram spotted on geekbench 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.