Xiaomi चा दसऱ्यादिवशीच धमाका! २०० मेगापिक्सलचा कॅमेरावाला स्मार्टफोन लाँच, दुसरा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 01:52 PM2022-10-05T13:52:03+5:302022-10-05T13:52:19+5:30

भारत ही स्मार्टफोन कंपन्यांची मोठी बाजारपेठ आहे. दोन्ही फोनचे डिझाईन एकसारखेच आहे.

Xiaomi 12T and 12T Pro announced with 200MP camera: Check specifications and price | Xiaomi चा दसऱ्यादिवशीच धमाका! २०० मेगापिक्सलचा कॅमेरावाला स्मार्टफोन लाँच, दुसरा...

Xiaomi चा दसऱ्यादिवशीच धमाका! २०० मेगापिक्सलचा कॅमेरावाला स्मार्टफोन लाँच, दुसरा...

googlenewsNext

Xiaomi ने आपला नवा प्रिमिअम फोन लाँच केला आहे. Xiaomi 12T आणि Xiaomi 12T Pro अशी या दोन्ही फोनची नावे असून महत्वाचे म्हणजे एकामध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन सध्या ग्लोबल मार्केटमध्ये उपलब्ध केला जाणार आहे. भारतात हा फोन कधी लाँच होईल याची माहिती मिळालेली नाही. 

भारत ही स्मार्टफोन कंपन्यांची मोठी बाजारपेठ आहे. Xiaomi 12T ची किंमत 599 यूरो म्हणजेच ४८ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. ही बेस व्हेरिअंटची किंमत आहे. बेस व्हेरिअंटमध्ये 8GB रॅम सोबत 128GB ची इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. Xiaomi 12T Pro ची किंमत 749 यूरो म्हणजे 60,500 रुपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोन ब्लॅक, ब्ल्यू आणि सिल्ह्वर रंगात उपलब्ध केले जाणार आहेत. 

दोन्ही फोनचे डिझाईन एकसारखेच आहे. मात्र, स्पेसिफिकेशनमध्ये थोडे अंतर आहे. Xiaomi 12T मध्ये  MediaTek Dimensity 8100-Ultra चिपसेट देण्यात आले आहे. तर प्रो व्हेरिअंटमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. 
या फोनमध्ये 6.7-इंचाची टचस्क्रीन 2712x1220 पिक्सल रिझोल्यूशनची देण्यात आली आहे. यामध्ये रिफ्रेश रेट 120Hz  असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 120W वायर्ड चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन १९ मिनिटांत फुल चार्ज होणार आहे. 

प्रोमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी सेन्सर हा २०० मेगापिक्सलचा आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तर 12T मध्ये 108-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. दोन्ही फोनमध्ये 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

Web Title: Xiaomi 12T and 12T Pro announced with 200MP camera: Check specifications and price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :xiaomiशाओमी