पॉवरफुल Xiaomi 12X 5G भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर; वनप्लस-सॅमसंगला देणार जोरदार टक्कर
By सिद्धेश जाधव | Published: December 30, 2021 07:29 PM2021-12-30T19:29:02+5:302021-12-30T19:30:41+5:30
Xiaomi 12 Series मधील Xiaomi 12X स्मार्टफोन भारतात एंट्री करणार आहे. 50MP कॅमेरा, 67W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8GB RAM सह हा फोन सादर केला जाईल.
Xiaomi 12 Series कंपनीनं काही दिवसांपूर्वी चीनमध्ये सादर केली आहे. या सीरीजमध्ये Xiaomi 12, Xiaomi 12 Pro आणि Xiaomi 12X असे तीन भन्नाट फोन्स आले आहेत. आता या सीरिजमधील सर्वात स्वस्त Xiaomi 12X भारतीयांच्या भेटीला येत आहे, अशी माहिती 91mobiles नं दिली आहे. या फोनचे दोन रॅम व्हेरिएंट आणि तीन कलर ऑप्शन सादर केले जातील. Xiaomi 12X ची भारतीय किंमत 40,000 रुपयांच्या आसपास असू शकते.
Xiaomi 12X चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.28 इंचांदीचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले मिळेल. 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशनसह येणार हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच यात HDR10+ आणि 1100 निट्स पर्यंत पीक ब्राईटनेस देण्यात आली आहे. हा फोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर चालतो. Xiaomi 12X मध्ये Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसर आहे. सोबत 8GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज आहे.
फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 13MP चा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 5MP चा टेलीमॅक्रो कॅमेरा आहे. या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. Xiaomi 12X स्मार्टफोन 67W फास्ट चार्जींग असलेल्या 4,500mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा:
सेकंड हँड स्मार्टफोन घेताना ‘या’ चुकांमुळे तुमचे पैसे जाऊ शकतात वाया