Xiaomi च्या स्वस्त Redmi 10 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स लीक; असा असेल स्मार्टफोन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 06:57 PM2021-07-14T18:57:30+5:302021-07-14T19:02:50+5:30
शाओमीचा Redmi 10 स्मार्टफोन FCC सर्टिफिकेशन आणि IMEI सर्टिफिकेशनवर लिस्ट करण्यात आला आहे.
20 जुलैला शाओमी भारतात रेडमी सीरिजमधील पहिला आणि स्वस्त 5G स्मार्टफोन Redmi Note 10T लाँच करणार आहे. त्याचबरोबर कंपनी बजेट Redmi सीरीजवर देखील काम करत आहे. शाओमीचा Redmi 10 स्मार्टफोन मॉडेल नंबर 21061119AG सह FCC सर्टिफिकेशन आणि IMEI सर्टिफिकेशनवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगवरून शाओमीच्या या स्मार्टफोनच्या नावाची आणि काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. या सर्टिफिकेशन्सवरून समजले आहे कि Redmi 10 स्मार्टफोन लवकरच भारत, युरोप, रशिया, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये लाँच होऊ शकतो.
Redmi 10 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
शाओमीच्या आगामी Redmi 10 स्मार्टफोनमध्ये Android 11 आधारित MIUI 12.5 असेल. तसेच या फोनमध्ये ड्युअल बँड Wi-Fi आणि 4G कनेक्टिविटी मिळेल. तसेच हा रेडमी फोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज, 4GB रॅम + 128GB स्टोरेज, आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. IMEI लिस्टिंगवरून जास्त माहिती मिळाली नाही परंतु Xiaomi चा हा फोन मॉडेल नंबर 21061119AG सह आणि Redmi 10 नावाने बाजारात येईल हे समजले आहे.
Redmi 10 सीरिज Redmi 9 सीरिजची जागा घेणार आहे त्यामुळे जुन्या सीरिजच्या तुलनेत यात सुधारणा केल्या जाऊ शकतात. Redmi 10 स्मार्टफोन कधी लाँच केला जाईल याची माहिती मात्र अजून मिळाली नाही. परंतु, Redmi 9 सीरिजला एकवर्ष पूर्ण होऊन गेल्यामुळे ही सीरिज लवकरच बाजारात येऊ शकते.