Xiaomi लाईफस्टाईलमध्येही उतरली; स्पोर्ट शूज लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 04:15 PM2019-02-06T16:15:25+5:302019-02-06T16:23:30+5:30

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. 

Xiaomi also landed in Lifestyle; Sport shoes Launch | Xiaomi लाईफस्टाईलमध्येही उतरली; स्पोर्ट शूज लाँच

Xiaomi लाईफस्टाईलमध्येही उतरली; स्पोर्ट शूज लाँच

googlenewsNext

नवी दिल्ली : Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. Xiaomi ने नुकतेच Mi Mens Sports Shoes 2 लाँन्च केले आहेत. या शूजची किंमतही 2499 एवढी ठेवण्यात आली आहे. मात्र, भारतात सध्या हे शूज उपलब्ध होणार नाहीत. 


शाओमीने अधिकृतरित्या दिलेल्या माहितीमध्ये या शूजची विक्री 15 मार्चपासून होणार आहे. हे शूज म्हणजे स्टाईल आणि परफॉर्मन्सचा उत्तम मिलाप असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनी या शूजना देणगीदारांच्या निधीतून बनविण्यात आले आहे. हे शूज 15 मार्च पासून पाठविले जाणार आहेत. कंपनी या शूजवर 500 रुपयांची ऑफर देणार आहे. 


हे शूज 5 इन 1 युनी मोल्डिंग प्रक्रियेनुसार बनविले आहेत. यानुसार या शूजमध्ये 5 वेगवेगळे मटेरिअलचा वापर केला गेला आहे. ज्यामुळे शूज शॉक प्रुफ, ड्युरेबल आणि स्लिप रेझिस्टंट बनतात. या शूजमध्ये आरामदायीपणासाठी फिशबोन स्ट्रक्टर देण्यात आले आहे. यामुळे अपघातावेळी लचक भरण्याची शक्यता कमी होते. तसेच हे शूज वॉशिंग मशिनमध्येही धुता येणार आहेत. या शूजची ग्रीपही चांगली पकड ठेवते. हे शूज ब्लॅक, डार्क ग्रे आणि ब्ल्यू रंगामध्ये उपलब्ध होणार आहेत. 

चीनच्याच वनप्लस या कंपनीने बॅकपॅक लाँच केले होते. 

Web Title: Xiaomi also landed in Lifestyle; Sport shoes Launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :xiaomiशाओमी