Xiaomi Phones: भारतात येणार स्मार्टफोन्सचा पूर; Xiaomi ची जोरदार तयारी सुरु
By सिद्धेश जाधव | Published: November 20, 2021 03:07 PM2021-11-20T15:07:48+5:302021-11-20T15:08:20+5:30
Upcoming Xiaomi Phones: Xiaomi च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी शाओमी आणि रेडमी ब्रँड्स अंतर्गत अनेक नवीन स्मार्टफोन आणि अन्य डिवाइसेस भारतात लाँच करणार आहे.
Xiaomi Phones: Xiaomi आणि सब-ब्रँड Redmi अंतर्गत भारतात अनेक नवीन स्मार्टफोन सादर केले जाणार आहेत. याची सुरुवात 30 नोव्हेंबर 2021 ला कंपनीच्या Redmi Note 11T 5G स्मार्टफोनपासून होईल. टिप्स्टर मुकुल शर्मानुसार Xiaomi आणि Redmi भारतात अनेक प्रोडक्ट्स लाँच करणार आहेत. यातील काही डिवाइसेसची माहिती समोर आली आहेत.
Redmi Note 11T 5G स्मार्टफोनच्या 30 नोव्हेंबरच्या लाँच इव्हेंटमधून Redmi Band Pro सादर केला जाईल. जो गेल्यावर्षी लाँच झालेल्या रेडमी स्मार्ट बँडचा अपग्रेड व्हर्जन आहे. जागतिक बाजारात लाँच झालेला Redmi Watch 2 Lite देखील भारतीय बाजारपेठेत पदार्पण करू शकतो. हा स्मार्ट वॉच यावर्षीच्या अखेरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो.
Upcoming Xiaomi Phones
शाओमी आणि रेडमीच्या भारतात लाँच होणाऱ्या डिव्हाइसेसची अचूक माहिती देण्यात आली नाही. परंतु चीनमध्ये आलेली Redmi Note 11 सीरीज नव्या ढंगात भारतात सादर केली जाईल. ही सीरिज पुढील वर्षाच्या सुरुवातीला सादर केली जाऊ शकते. तसेच Xiaomi ब्रँड अंतर्गत Xiaomi 11T आणि 11T Pro फ्लॅगशिप फोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतात.
Xiaomi 11T आणि 11T Pro हे फोन्स याआधीच जागतिक बाजारात आले आहेत. त्यामुळे Xiaomi 11T सीरिज देशात सादर केली जाऊ शकते. तसेच Xiaomi 11i आणि Xiaomi 11i HyperCharge देखील भारतात लाँच होऊ शकतात. हे दोन्ही फोन चीनमध्ये आलेल्या Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ चे रिब्रँडेड व्हर्जन असू शकतात.