अर्ध्या मिनिटांत रूम थंड करणारा एसी आला; 30 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणार Xiaomi AC
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 10:05 AM2022-06-06T10:05:36+5:302022-06-06T10:05:44+5:30
Xiaomi Giant Power Saving Pro 1.5HP तुम्ही गर्मीतून वापरू शक्यच तसेच थंडीतून देखील या एसीचा उपयोग करता येईल.
शाओमीनं सुरुवात जरी स्मार्टफोन निर्माता म्हणून केली असली तरी हळूहळू कंपनीनं इतर इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरीमध्ये देखील हातपाय पसरले आहेत. कंपनीचे व्हॅक्युम क्लिनर रोबोट प्रसिद्ध आहेत, तर वॉशिंग मशीन, ओव्हन, कॉफी मशीन इत्यादी प्रोडक्ट्स देखील सादर केले आहेत. आता कंपनीनं Xiaomi Giant Power Saving Pro 1.5HP नावाचा नवीन फास्ट कूलिंग एसी ग्राहकांच्या भेटीला आणला आहे.
अर्ध्या मिनिटांत रूम थंड
शाओमीनं आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोमध्ये नव्या एयर कंडिशनरची भर टाकली आहे. विशेष म्हणजे हा एसी वेगवान कुलिंग देतो, असा दावा देखील कंपनीनं केला आहे. तसेच थंडीत हिटर म्हणून देखील या एसीचा वापर करता येईल. हा शाओमी एसी मॉडेल 5.3AFP पर्यंत ऑफर करतो, ज्याचा उपयोग जास्त तापमान असताना केला जातो. नवा Xiaomi Air Conditioner फक्त 30 सेकंदात कुलिंग आणि मिनिटभरात हीटिंग देतो.
हा मॉडेल -32 सेल्सियस आणि 60 सेल्सियस टेम्परेचरला सपोर्ट करतो. तसेच हा एक पावर सेविंग एसी असल्यामुळे विजेची बचत देखील होते. कूलिंग आणि हीटिंग लोड्ससाठी या एसी मध्ये सेल्फ-अडॅैप्टिव प्रिडिक्शन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे, कंप्रेसर हाय स्पीडवर सुरु होऊ शकतो.
वेगाने हीटिंग आणि कूलिंग देण्यासाठी या एसीमधील क्रॉस-फ्लो फॅनसह हीट एक्सचेंस प्रोसेस देखील शानदार आहे. याला स्मार्ट एसी बनवण्यासाठी कंपनीनं Mijia ची एआय व्हॉइस कंट्रोल क्षमता दिली आहे. या Xiaomi AC ची किंमत चीनमध्ये कंपनीनं 2499 युआन (जवळपास 29,121 रुपये) ठेवली आहे. भारतीय लाँचची मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही.